NIA Action News : तरुणाची पाकिस्तानात चॅटिंग, सतरंजीपुऱ्यात एनआयएची कारवाई!

Nagpur : संशय आल्याने ही चौकशी करण्यात आली आहे.
Action by NIA in Nagpur
Action by NIA in NagpurSarkarnama

Nagpur City News : नागपूर शहरातील सतरंजीपुरा, भालदारपुरा येथील एक युवक व्हॉट्सॲपवर पाकिस्तानात चॅटिंग करीत होता. याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली. त्यावरून एनआयएने आज पहाटे ४ वाजता सतरंजीपुरा परिसरात जाऊन कारवाई केली. (This investigation has been conducted due to suspicion)

टेरर फंडिंग संदर्भात संशय आल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. ही कारवाई करताना तणावसदृष्य स्थिती निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेता लकडगंज आणि कोतवाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त सतरंजीपुरा, भालदारपुरा परिसरात लावण्यात आला होता.

नागपुरात छापेमारी करण्यासाठी आलेल्या एनआयएच्या पथकाला जमाते रजा मुस्तफा या संघटनेच्या स्थानिक नेटवर्कचा शोध होता. याचाच तपास करत असताना सतरंजीपुऱ्यातील अब्दुल मुस्तदीर या तरुणाने पाकिस्तानात फोन केल्याचं लक्षात आलं. त्यामुळे या तरुणाची चौकशी करण्यात आली. नागपूर शहरात आणखी कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा सध्या करीत आहे.

तरुणाने पाकिस्तानात व्हाट्सॲपवर चॅटिंग केली होती. या चॅटिंगवर संशय आल्याने ही छापेमारी केली. एकूण तीन ठिकाणी हा छापा कारवाई केली आहे.. या प्रकरणात चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या मोबाईलमधील सिम कार्ड आणि मोबाईल फोन एनआयएने ताब्यात घेतले आहे.

Action by NIA in Nagpur
मोठी बातमी ! NIA ने आवळल्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या

प्रतिबंधित संघटन जाकीर नाइकचे संगठन इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी (आईआरएफ) संबंधित लोकांवर ही कारवाई केल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या सीमच्या माध्यमातून पाकिस्तानात (Pakistan) संशयास्पद व्हॅाट्सॲप चॅटिंग केल्याचेही सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातील व्यक्तीशी व्हॉट्सॲप वरून संशयास्पद चाट केल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे.

अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती आहे. पहाटे चार वाजता एनआयएच्या (NIA) टिमने कारवाई केल्याने नागपुरात (Nagpur) खळबळ उडाली आहे. सद्यःस्थितीत टीम चौकशी करून परतली असून अद्याप कुणाला ताब्यात घेतल्याची माहिती नाही. टीम कडून काही सीम कार्ड ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.

Action by NIA in Nagpur
NIA Raid : PFIच्या कार्यालयांवर एनआयएचे छापे ; पुण्यातील दोनजणांसह राज्यात 20 जणांना अटक

प्राप्त माहितीनुसार अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार हे दोघेही ऑटो चालवतात. तर तिसरा व्यक्ती गुलाम मुस्तफा कादिर रिझवी हा आहे. याचा संत्रा मार्केटमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय आहे, असल्याची माहिती आहे. गुलाम मुस्तफा हा जमात ए रजा मुस्तफा अकादमी या स्वयंघोषित अध्यक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com