अमरावतीचा पुढचा खासदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा असेल : आमदार पटेल यांची मेळाव्यात घोषणा

जनतेच्या हिताची कामे पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
Rajkumar Patel
Rajkumar PatelSarkarnama

अमरावती : ‘‘अमरावती (Amravati) जिल्ह्याचा खासदार हा अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघ ठरविणार आहे. आम्ही आमदार आहोतच. पण, पुढच्या निवडणुकीत अमरावतीचा खासदार (MP) हा प्रहार संघटनेचा असेल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती संघटनेचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी केली. (Next MP from Amravati will be from Prahar Sangathan : MLA Rajkumar Patel)

आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादानंतर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचा मेळावा आयोजित कऱण्यात आला आहे. त्यात आमदार पटेल बोलत होते. आमदार पटेल म्हणाले की, बच्चू कडू यांनी मला विधानसभेचे तिकिट दिले. त्यांनी सांगितले की तुम्ही लढा; पण मैदान सोडून जाऊ नये. प्रहारच्या तिकिटावर मी विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेलो आहे. आज आपल्याला संधी मिळाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार संघटनेच्या सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत.

Rajkumar Patel
डॉ. राहुल गेठे बहुत उड रहा है... : मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी

असा कोणता आमदार आहे की तो सत्तेत बसणार नाही. मी आमदार झाल्यापासून माझ्या मतदारसंघातील धरणाचे ७५ टक्के काम आहे. ती अपूर्ण कामे आम्हाला पूर्ण करायची आहेत. जनतेच्या हिताची कामे पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते भलतेच आमच्यावर काहीतर आरोप लावत आहेत. आम्हाला प्रेमाने गुहाटीला घेऊन गेले. आम्ही पडलो आदिवासी आम्हाला कुठं माहित आहे विमानात बसायचं. शिंदे साहेब म्हणाले प्लेनमधून जाऊ. मी म्हटलं जाऊ. कारण मी यापूर्वी विमानात कधी बसलोच नाही. आता मला काय माहिती ते मला कशासाठी घेऊन गेले आहेत, असा किस्साही राजकुमार पटेल यांनी सांगितला.

Rajkumar Patel
'राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याची एवढी काळजी का?'

गुहाटीवरून आल्यानंतर राज्यात उलटफेर झाला. आम्ही केलं काय उलटपालट. आमच्या मतदारसंघासाठी आम्हाला निधी मिळावा, यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. विकासासाठी आम्ही सत्तेच्या सोबत राहणार आहोत. प्रहार जनशक्ती संघटनेचे आम्ही कार्यकर्ते आहोत. चांगल्या-वाईट दिवसांत आपण बच्चू कडू यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहनही आमदार पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com