भंडारा अत्याचार प्रकरणाला नवे वळण; दोन पोलिस अधिकारी निलंबित

Bhandara case : पोलिसांच्या हालगर्जी पणामुळे पिडितेवर दुसऱ्यांदा अत्याचार
Police
Policesarkarnama

Bhandara case : भंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये एक ३५ वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु असुन त्यामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता लखानी पोलिस (Police) स्टेशनच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

त्यामध्ये एपीआय लखन उईके व पीएसआय दिलीप खरडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. पिडीतेवर अत्याचार झाला त्यावेळी ती पोलिस स्टेशनला आली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात हालगर्जीपण केल्यामुळे पिडीतेवर दुसऱ्यांदा आत्याचार झाला. यामुळे दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी हालगर्जी पण केल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला आहे.

Police
आक्रमक कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले…

दरम्यान, बहिणी सोबत झालेल्या वादातून रागाच्या भारात घरून निघून गेलेल्या 35 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्हाच्या कारधा पोलिश स्टेशनच्या हद्दीत 2 ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आली होती. पोलिसानी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

पीडिता महिला हि 31 जुलैला लाखनी पोलिस ठाण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तिच्याकडे लक्ष न दिल्याने पीडिता पोलिस ठाण्यातून पळून गेली. त्यामुळे या प्रकरणात दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले. पीडित महिला हि 30 जुलैला बहिनीच्या घरून निघाली असता आरोपी क्रमांक एकने पीडितेवर गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुरदोली गावच्या जंगलात अत्याचार केला. 31 जुलैला पुन्हा पसळसगावच्या जंगलात घेऊन जात अत्याचार करीत पिडीतेला लखानी पोलिस स्टेशनच्या हद्दीत नेऊन सोडून दिले.

पीडिता हि रस्त्याने पायी जात असल्याचे पाहताच मुरमाळी गावातील महिला पोलिस पाटील यांनी विचारपूस केली. त्यानंतर डायल 112 वर फोन करुन पीडितेला लाखनी पोलिस स्टेशनला पाठविले. मात्र, त्या ठिकणी महिलेला नेल्यावर प्राथमिक उपचार न करता किंवा तिची योग्य रित्या विचारपूस न करता महिलेला रात्रभर पोलिस सटेशनमध्ये बसवून ठेवले. त्यामुळे पीडिता हि पोलिस ठाण्यातून सकाळी पळून गेली, असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर ती कन्हाळमोह गावातील धर्मा धाब्यावर पोहचली. तिने तिने धर्मा धाब्यावर असलेल्या पंक्चर दुकान चालकाला आप बीती सांगितली. दुकान चालकाने पीडितेला विश्वसात घेत आरोपी क्रम 3 च्या सोबत जा तो तुला घरी सुरक्षित सोडून देईल असे सांगितले. मात्र, या आरोपीने पीडितेला जवळच असलेल्या शेतात घेऊन गेला. त्याच वेळी आरोपी क्रमांक एक पंच्चर दुरुस्त करणारा इसम हा देखील त्या ठिकाणी आला. दोघांनी पीडितेवर रात्रभर अत्याचार करीत, 2 ऑगस्टच्या पहाटे बेशुद्ध अवस्थेत कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सोडून दिले.

दुसऱ्यांदा झालेला अत्याचार हा लाखनी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे उघडकीस आले आहे. स्वतः नागपूरचे प्रभारी पोलिस महानिरीक्षख संदीप पाटील यांनी या संदर्भात लाखनी पोलिस ठाण्यात येत चौकशी केली आहे. त्यानंतर दोषी अधिकऱ्यावर कारवाई करण्यात आली. पीडिता हि गोंदिया जिल्हाच्या गोरेगाव तालुक्यातील रहाणार असल्याने आणि पहिल्यादा झालेला अत्याचार हा गोरेगाव पोलिसांच्या हद्दीत झाल्याने, हा तपास आता गोंदियाच्या गोरेगाव पोलिसानकडे देण्यात आला आहे.

Police
आमदार बावनकुळे म्हणाले, आजही निवडणूक झाली, तरीही भाजप सज्ज !

आरोपी क्रमांक 1 चा शोध घेण्यासाठी गोरेगाव पोलिस सीसी टीव्ही कॅमरे तपासात आहेत. तर लाखनी पोलिसानी केलेल्या हलगर्जीपणा संदर्भात भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी याना विचारले असता ते म्हणाले, पीडिता हि पोलिस ठाण्यात आली होती. त्यावेळी तिचे कपडे देखील हे व्यवस्थित होते. मात्र, तिला विचारपूस केल्यावर ती काहीही सांगत नव्हती. त्यामुळे तिला पोलिस ठाण्यात असलेल्या महिला सुरक्षा कक्षात महिला पोलिस शिपयासोबत बसवून ठेवले होते. मात्र, पहाटेच्या सुमार महिला पोलिस ठाण्यातून पळून गेली, असे त्यांनी सांगितले. आता या प्रकरणात अधिक तपास करणार असल्याचे मतानी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com