Amravati : नवीन चेहरा असलेले धीरज लिंगाडे आमदार झाले, त्याची ‘ही’ आहेत कारणे...

Dhiraj Lingade : परवा परवा पर्यंत कुणाला माहिती नसलेले धीरज लिंगाडे आमदार झाले.
Dhiraj Lingade, Amravati
Dhiraj Lingade, AmravatiSarkarnama

Amravati Graduate Constituency Election Results : १२ वर्षाच्या आमदारकीचा अनुभव आणि बलाढ्य भाजपचे संघटन पाठीशी असतानाही डॉ. रणजीत पाटलांना अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

परवा परवा पर्यंत कुणाला माहिती नसलेले धीरज लिंगाडे आमदार झाले. याची कारणे शोधली असता पुन्हा लक्ष भाजपमधील गटबाजीकडे वळते. भाजपमधील गटबाजी डॉ. रणजीत पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत आहेच. पण त्याशिवाय रणजीत पाटली यांना त्यांच्याच काही चुका भोवल्या.

मागील कारकिर्दीमध्ये त्यांनी पदवीधरांकडे साफ दुर्लक्ष केले. ते अकोल्याचे स्थानिक असल्याने इतर जिल्ह्यांकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अमरावतीसारख्या मोठ्या जिल्ह्याकडे तरी लक्ष ठेवायला पाहिजे होते. पण तेसुद्धा त्यांनी केले नाही. मतदार आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही त्यांनी गृहीत धरले आणि येथेच त्यांचा घात झाला.

रणजीत पाटील या निवडणुकीत पडू शकतात, असे भाजपचे काही नेते खासगीत बोलत होते. तेव्हाच त्यांच्या बोलण्यातील अर्थ अनेकांना कळला होता. त्यानंतर पाटलांनी लक्ष दिले नाही. अकोल्यातील एका गटाचा विरोध म्हटला, तर तो गेल्या दोन निवडणुकांमध्येही होता. पण तरीही ते दोन वेळा निवडून आले.

पण यावेळी त्यांनी भाजपमधील ‘त्या’ गटासोबतच इतरही अनेक जण नाराज होते. पाच जिल्ह्यांतील आमदारांनी पाटलांसाठी काम केले नसल्याचेही सांगण्यात येते. ही गोष्ट पटण्यासारखी आहे. कारण काही आमदार त्यांच्या प्रचारात दिसलेच नाहीत, असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात.

कुठे गेली भाजपची शिस्त, संघटन ?

एरवी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कॅडर दिसते. पण या निवडणुकीत ते दिसलेच नाही. कारण गेल्या दोन टर्ममध्ये रणजीत पाटील यांनी काम केले नाही, असेच भाजपचे (BJP) नेते, कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले.

त्यामुळेच नवख्या लिंगाडे यांचा विजय सोपा झाला. नाहीतर केवळ १५ दिवसांपूर्वी उमेदवारी घोषित झालेले लिंगाडे जिंकू शकले नसते. लिंगाडेंचा विजय म्हणजे रणजीत पाटलांवरची नाराजी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

Dhiraj Lingade, Amravati
Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

धीरज लिंगाडे यांना १५ दिवसांऐवजी थोडी आधी जर उमेदवारी मिळाली असती, तर त्यांचा विजय यापेक्षाही मोठा झाला असता, असेही राजकीय (Political) जाणकार सांगतात. कारण कुणाला नावही माहिती नसलेला माणूस येतो आणि १५ दिवसांत भाजपसारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करतो, हे शक्य झाले नसते.

भाजपमधीलच काही मंडळी आणि नुटा यांना रणजीत पाटलांना हरवायचेच होते आणि त्यासाठी त्यांना लिंगाडे हा सर्वपक्षीय पर्याय सापडला. ते महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार होते. त्यामुळे पाटलांच्या विरोधात सर्व एकवटले आणि लिंगाडेंना निवडून आणले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com