Ner APMC Election Result : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस गमावले, पण नेरमध्ये मिळवला विजय !

Ner : क्षणोक्षणी हृदयाचे ठोके वाढवणारे प्रसंग निवडणुकीत घडले.
Sanjay Rathod
Sanjay RathodSarkarnama

Yavatmal District's Ner APMC Election Results : अत्यंत चुरशीची व अस्तित्वाची लढाई असलेल्या नेर बाजार समितीच्या या निवडणुकीत यावेळी अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. क्षणोक्षणी हृदयाचे ठोके वाढवणारे प्रसंग निवडणुकीत घडले. पालकमंत्री संजय राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचा गढ कायम राखण्यात यश मिळविले तर काँगेस व उद्धव सेनेचा या निवडणुकीत पराभव झाला. (The Thackeray group and the Congress alliance have captured a total of 8 seats)

एकूण १८ संचालकासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने एकूण १० जागांवर विजय प्राप्त केला. तर उद्धव ठाकरे गट आणि काँगेस आघाडीने एकूण आठ जागा काबीज केल्या आहे. जिल्ह्यात नेर बाजार समितीचा निवडणूक शुक्रवारी (ता. २८) निकाल मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत सुरू होता. कार्यकर्त्यांसह उमेदवारदेखील निवडणूक केंद्राबाहेर ताटकळत उभे होते.

आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने नेर बाजार समितीची निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची होती. यामध्ये पालकमंत्री संजय राठोड ,खुद्द काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख, राष्ट्रवादीचे नेते वसंतराव घुईखेडकर यांचे अस्तित्व पणाला लागले होते. बाजार समितीमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार झाल्याने सहकार क्षेत्रात कोण बाजी मारेल याची उत्सुकता जिल्ह्याला होती.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून नवीन युती जन्माला घातली तर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्याशी घरोबा कायम ठेवत थेट मंत्री संजय राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र राठोड आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाले.

Sanjay Rathod
Yavatmal APMC Results : यवतमाळ जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा उठला ‘बाजार’ !

नेर बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी ग्रामपंचायत मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार विजयी झाले. यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज नाल्हे हे १८६ मते घेऊन विजयी झाले, प्रमोद किसन राठोड यांनी १५४ मते घेत विजय मिळवला, तर माजी सभापती रवींद्र राऊत व काँग्रेसचे नरेंद्र राठोड यांना १६० अशी समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीमध्ये रवींद्र राऊत यांचा विजय झाला. तर नरेंद्र डवरे यांनी १६४ मते घेऊन विजय मिळवला आहे.

सहकारी संस्था मतदारसंघामधे काँगेसचे चार उमेदवार तर राष्ट्रवादीचा एक, उद्धव ठाकरे गटाचे चार उमेदवार विजयी झाले. यामध्ये काँग्रेसचे गजानन महल्ले १८१ मते घेऊन विजयी झाले. सुनिता अर्जुन ठाकरे यांनी १८३ मते घेऊन विजय मिळवला. तर दिलीप तिमाने यांनी १७१ मते घेऊन विजय प्राप्त केला. प्रदीप भगत व भास्कर तुपटकर यांना प्रत्येकी १६४ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीत प्रदीप भगत विजयी झाले. उद्धव ठाकरे गटाचे परसराम गावंडे १८६ मते, निखिल जैत १८६ मते गोपाल चव्हाण १७० मते, बाबाराव राठोड यांनी १७८ मते घेऊन विजय मिळवला.

Sanjay Rathod
Ramtek APMC : रामटेकमध्ये पराभवानंतरही राहणार केदारांचेच वर्चस्व?

सहकारी संस्था मतदार संघातून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रशांत मासाळ १७२ मते, मनीषा गावंडे यांनी १८७ मते घेत विजयी झाले. राष्ट्रवादीचे केशव सोळंके यांनी १८५ मते घेऊन विजय मिळवला. हमाल मापारी मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे पंकज गुल्हाने २३५ मते घेऊन विजय मिळवला. व्यापारी अडते मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे किशोर लोढा यांनी १५१ मते घेऊन विजय मिळवला तर विष्णू राठोड यांनी १२९ मते घेत विजय प्राप्त केला.

या निवडणुकीत भाजप, (BJP) वंचित, (Vanchit Bahujan Aghadi) मनसे (MNS) यांनी तयार केलेल्या युतीला खातेही उघडता आले नाही. शिवसेनेचे माजी सभापती भाऊराव ढवळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत (APMC Election) १८८ मते अवैध ठरले. रात्री १.३० पर्यंत चाललेल्या मतमोजणीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com