NCPचे सतीश ईटकेलवार यांना माघार घ्यावी लागणार, कारण...

Mahavikas Aghadi : ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे.
Satish Itkelwar, NCP
Satish Itkelwar, NCPSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी काल नामांकन अर्ज दाखल केला. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. हे माहिती असूनसुद्धा त्यांनी नामांकन भरले. त्यामुळे त्यांना उमेदवारी परत घ्यावी लागेल, अशी चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते. त्यांनीच नाकाडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे इटकेलवार यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे. नागपूर (Nagpur) विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी एकूण २७ उमेदवारांनी दावेदारी दाखल केली. काल शेवटच्या दिवशी भाजप समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार, बसपाच्या निमा रंगारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे आदी प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

नागो गाणार यांच्यासह आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर कल्पना पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बसपाच्या नीता रंगारी यांच्यासोबत प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव विजय डाहाट, जितेंद्र घोडेस्वार, सुरजभान चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्यावतीने इटकेलवार यांच्यासोबत शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

Satish Itkelwar, NCP
NCP News : राष्ट्रवादीच्या कटकटी संपेनात : लोकसभेतील एकाची खासदारकी जाणार; संख्याबळ घटणार

या २७ शिक्षकांना व्हायचंय आमदार..

रामराव चव्हाण, सुधाकर अडबाले, मृत्युंजय सिंग, राजेंद्र झाडे, अजय भोयर, दीपराज खोब्रागडे, सुषमा भड, रवींद्र डोंगरदेव, बाबाराव उरकुडे, विनोद राऊत, सतीश जगताप, नरेंद्र पिपरे, गंगाधर नाकाडे, नागो गाणार, श्रीधर साळवे, सतीश इटकेलवार, उत्तमप्रकाश शहारे, नीलकंठ उइके, राजेंद्र बागडे, देवेंद्र वानखेडे, निमा रंगारी, सचिन काळबांडे, प्रवीण गिरडकर, अतुल रुईकर, मुकेश पुडके, संजय रंगारी, नरेश पिल्ले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in