Pune News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली गिरीश बापटांची भेट..

Girish Bapat : काही दिवसांपासून गिरीश बापटांवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Girish Bapat, Sharad Pawar
Girish Bapat, Sharad Pawarsarkarnama

Girish Bapat : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Girish Bapat latest news)

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही बापट यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आहे.

Girish Bapat, Sharad Pawar
Uddhav Thackeray : विधीमंडळात महत्त्वाचा मुद्दा सुरु असताना मुख्यमंत्री दिल्लीला का गेले ?

काल (रविवारी) निलम गोल्हे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. "बापट साहेब कसे आहात, सभागृहातील अनेक सदस्य आपली आठवण काढत आहे. तुम्ही अधिवेशनात जे कामकाज केले.त्याबद्दल अनेकांनी आठवण काढली,"असे गोऱ्हे म्हणाल्या.

Girish Bapat, Sharad Pawar
MNS : नव्या वादाला तोंड फुटलं ; मनसेनं उलगडली ठाकरे गटाच्या नेत्याची ती 'डायरी'

निलम गोऱ्हे म्हणाल्या, "अधिवेशन होताच आपणास अनेक सदस्य भेटण्यास येणार आहे.आपण लवकर बरे व्हा," असे म्हणताच "हो ताई, पण अधिवेशन कस चाललय आणि आणखी किती दिवस सुरू आहे," असे बापट म्हणाले. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृह चांगल चाललय आणि ३० तारखेपर्यंत अधिवेशन चालेल,पण तुम्ही लवकर बरे व्हा,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com