नितीन गडकरींना दलालांची भीती ? जाहीर सभेत व्यक्त केली चिंता

रोड मी बनविणार आणि काही जण जमिनी खरेदी करतील आणि नंतर दुप्पट भावानं विकतील.
Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi Newssarkarnama

गोंदिया : केंद्रिय रस्ते व वाहतूकमंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते गोंदिया येथे रस्ते (Gondia Ring Road) आणि पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजन रविवारी झाले. खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) व खासदार सुनील मेंढे यावेळी उपस्थित होते. (Nitin Gadkari news update in Marathi)

प्रफुल पटेल,व सुनील मेंढे यांनी गोंदिया रिंग रोड तयार करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली. त्यावेळी नितीन गडकरी यांनी एक भीती व्यक्त केली.

नितीन गडकरी म्हणाले, "गोंदिया येथे रस्ते आणि पुल होणं हे गरजेचे आहे. ही गोंदियांची मोठी समस्या आहे. रिंग रोडला मी मंजुरी देणार आहे. या कामाचा शुभांरभ लवकरच होईल. काही ठिकाणचे भूसंपादन अजून बाकी आहे. ते लवकरच होईल,"

Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच ; राष्ट्रवादीनं पटकावला पहिला 'क्रिकेटनामा' चषक

"या रिंगरोडच्या जवळ राज्य सरकारच्या सहकार्यानं अगोदर नवे स्मार्ट गोंदिया शहर बनवा. नाहीतर रोड मी बनविणार आणि काही जण जमिनी खरेदी करतील आणि नंतर दुप्पट भावानं विकतील. याठिकाणी रिंगरोड होण्याअगोदर स्मार्ट सिटीची योजना करा,"असे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari News in Marathi, BJP Latest Marathi News
Rajya Sabha elections : काँग्रेसकडून मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

"येथे चांगल्या सुविधा द्या. नगरपालिका, आमदार, खासदार यांचे त्यासाठी सहकार्य घ्या. लवकरच स्मार्ट गोंदिया करा.लोकांना स्वस्त भावात घरे मिळतील अशी योजना करा," अशा सूचना गडकरी यांनी पटेल यांना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com