NCP New President: शालिनीताईंचा शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला; म्हणाल्या, 'अजित पवार घोटाळेबाज.., त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल!

Shalinitai Patil on NCP New President: अजित पवार घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले आहेत..
Shalinitai Patil on NCP New President  news update
Shalinitai Patil on NCP New President news updateSarkarnama

Shalinitai Patil on NCP New President : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला.

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर नवा अध्यक्ष कोण? अशी चर्चा सध्या सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे , विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीतील या घडामोडींवर महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

शालिनीताईंना अजित पवारांवर गंभीर आरोप करीत त्यांना अध्यक्ष करु नये, असा सल्ला शरद पवारांना दिला आहे. माजी मंत्री शालिनीताई पाटील या शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून ओळखल्या जातात.

Shalinitai Patil on NCP New President  news update
Sharad Pawar News : 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी ठाकरेंच्या आरोपांमधील हवाच काढली..; ठाकरे गटाला उघडं पाडलं..

पवारांनी निर्णय घाईत घेतला..

शालिनीताई म्हणाल्या, " शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी आज 90 वर्षांची आहे. तरी लोक मला निवृत्ती घेऊ देत नाही. योग्य पर्याय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये. हा निर्णय त्यांनी घाईत घेतला आहे,"

अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते..

"अजित पवारांच्या पाठीशी भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अद्याप ईडीकडून चौकशी झालेली नाही. हसन मुश्रीफ यांची चौकशी होते, मग चौदाशे कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही?" असा प्रश्न शालिनीताईंनी उपस्थित केला आहे.

"अजित पवार घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले असल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल," असे त्या म्हणाल्या.

Shalinitai Patil on NCP New President  news update
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्या..

"अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्यात 1400 कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. मला हा प्रश्न पडला आहे, हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यांची ईडीने चौकशी केली मात्र अजूनपर्यंत अजित पवारांना का बोलावले नाही? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्यायला हवे," असे शालिनीताई म्हणाल्या.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com