राणा दाम्पत्याने फडणवीसांची रक्ततुला का केली? राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..

Vidarbha Politics| Amol Mitkari| आमच्या ५५ आमदारांपैकी कोणीही पन्नास खोक्यांसाठी गुवाहाटी, सुरतला गेले नाही याचा अभिमान
Amol Mitkari|
Amol Mitkari|

अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fafanvis) खुष करण्यासाठीच आमदार रवी राणा यांनी त्यांची रक्ततुला केली. कॅबिनेट मंत्रीपदासाठी त्यांनी हा खटाटोप केला असावा. फडणवीसांना खूश केलं तर ते आपल्याला मंत्रीपद देतील, या लालसेपोटीच राणा दाम्पत्याचा हा अट्टाहास सुरु आहे,अशी खोचक टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी केली. रविवारी अकोल्यात आयोजित एका दहीहंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंकेसह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी आदीच मारामाऱ्या सुरु आहे. त्यातच कॅबिनेट मंत्रीपदासाठी रवी राणांकडून फडणवीसांची रक्ततुला करण्यात आली. आता भाजपच्या आमदारांमध्येही मंत्रीपदाची इच्छा वाढत चालली आहे. एवढी लॉबिंग लागलेली आहे तिकडं. अमरावतीत रवी राणांनी फडणवीसांची रक्ततुला घेण्यामागे त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा असाच काहीसा उद्देश असावा, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

Amol Mitkari|
शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही; नितीन बानगुडे पाटलांनी थोपटले दंड

भाजपने हर घर तिरंगा अभियान सुरु केलं. पण ज्यांच्याकडे घरचं नाहीत त्यांंनी तिरंगा कुठे फडकवायचा. त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवणार का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आता वंदे मातरम अभियानही त्यांनी सुरु केलं आहे. पण हे खुन्नशीचं राजकारण भाजपकडून जाणीवपुर्वक केलं जातयं. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे राजकारण सुरु आहे. पण हे तुमच्या मनुस्मृतीचं राज्य नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं राज्य आहे. म्हणून मला आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा अभिमान आहे की आमच्या ५५ आमदारांपैकी कोणीही पन्नास खोक्यांसाठी गुवाहाटी, सुरतला गेले नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com