Amol Mitkari On Andhare : अंधारे या तर 'रडरागिणी'; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा टोला !

Maharashtra Politics : ''सध्या अजित पवारांवर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आलाय...''
Amol Mitkari On Sushma Andhare
Amol Mitkari On Sushma Andharesarkarnama

Mumbai : ठाकरे गटाची धडाडती तोफ सुषमा अंधारे या सातत्यानं भाजप व शिंदे गटातील नेतेमंडळीवर जोरदार हल्लाबोल करत असतात. मात्र, मंगळवारी(दि.९) सातारा येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसमोरच अंधारेंचा अश्रूंचा बांध फुटला. याचवेळी त्यांनी अजित पवारांविरोधात तक्रार केली. यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी अंधारेंचा 'रडरागिणी' असा उल्लेख करत टोला लगावला आहे.

आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी अजित पवारांचं समर्थन करतानाच सुषमा अंधारेंनाही डिवचलं आहे. यावेळी मिटकरींनी सकाळी ६ वाजल्यापासून सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा पवार आहेत. हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आला असल्याचं म्हटलं आहेत.

Amol Mitkari On Sushma Andhare
Maharashtra Political Crisis: राज्यात पुन्हा भुकंप होणार? शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

तसेच दादाविरुद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो, रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते असं सांगत त्यांनी #रडरागिणी असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे टि्वट...?

सकाळी 6 पासुन सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा! हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आलाय. दादा विरुद्ध "रडलो" तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो! #रडरागिणी... असं टि्वट केलं आहे.

Amol Mitkari On Sushma Andhare
Aditya Thackeray: मुंबईतील रस्त्यांच्या कामात 263 कोटींचा मोठा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

...म्हणून अजितदादांनी तो प्रश्न मांडला नसेल!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी सुषमा अंधारे यांच्या भावूक होण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ठोंबरे म्हणाल्या, अजित पवार यांच्या सांगण्यावरून आम्ही अंधारे यांच्यासाठी आवाज उठवला. पण काल त्या भाऊ-बहिण्याच्या नात्याप्रमाणे भावावर रागावल्या. त्या भावूक झाल्या. त्यामुळे यात इतकं असं काही मोठा विषय नाही.

संजय शिरसाठ, गुलाब गुलाबराव, अब्दुल सत्तार यांनी जे बोलले त्यावर राष्ट्रवादीकडून मी असेन किंवा सुप्रियाताई यांनी आवाज उठवला आहे. तर राहिला प्रश्न अजित पवार यांचा तर त्यावेळी अधिवेशन सरळ चालत नव्हतं, तर राज्याचे इतर प्रश्न होते. त्यामुळे कदाचित अजित पवार यांनी तो प्रश्न मांडला नसेल असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

Amol Mitkari On Sushma Andhare
Imran Khan Arrested : पाकिस्तानी अभिनेत्रीचं Tweet चर्चेत ; मोदी अन् ROW च्या विरोधात तक्रार..; दिल्ली पोलीस म्हणतात...

अंधारे काय म्हणाल्या होत्या ?

साताऱ्यातील एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भाषण केले, त्या म्हणाल्या की, इथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीनं माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही.

सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता अशी तक्रार अंधारे यांनी पवारांकडे केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com