Praful Patel : आता प्रफुल्ल पटेलांनीही दंड थोपटले, म्हणाले...

Praful Patel News : '२०२४ ची निवडणूकच ठरवेल की कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल...'
MP Prafull Patel
MP Prafull PatelSarkarnama

Praful Patel News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट आव्हान देत येणाऱ्या निवडणुकांमध्ये बारामतीत घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार असं चॅलेंज त्यांनी दिलं. त्यानंतर त्यांच्या या आव्हानाला अजित पवार यांनी प्रतिआव्हान देत बावनकुळे यांनाच करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आव्हानाला आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर देत २०२४ ची निवडणूकच ठरवेल की कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा पलटवार त्यांनी केला आहे. तर आम्ही देखील मैदानात उतरलोय, असं म्हणत लोकसभा निवडणुकीबाबत प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ''भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा २ जानेवारीला औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांची ही सभा म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. पण सर्वच पक्ष हे आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत असतात. ते जर लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतील तर आम्ही देखील मैदानात उतरलोय'', असं विधान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलं आहे.

MP Prafull Patel
Devendra Fadnavis :अजित पवारांच्या भाषणातील अर्धे भाषण जयंत पाटलांचे वाटत होते : फडणवीसांचा चिमटा

पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ''तुम्ही ४० आमदार काढले काही खासदारही काढले. पण आता तुम्ही लोकांचे मतं किती मिळवता? हे येणारा काळच ठरवेल. सेनेच्या कार्यालयावर आपला ताबा करता, मात्र बाळासाहेबांचे अनुयायी म्हणणारे स्वतःच शिवसेना संपवायला निघालेत, असं म्हणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला.

MP Prafull Patel
Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना मुख्यमंत्री निःशब्द होतात तेव्हा...

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे २ जानेवारीला औरंगाबादमध्ये सभा घेणार असून त्यांची ही सभा म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोललं जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केल्याने राजकीय पक्षांनी आत्ताच निवडणुकीचे रणशिंग तर फुंकले नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com