राष्ट्रवादीच्या गटनेत्याने आदेश धुडकावला, कार्यकर्ते स्थापन करणार तिसरी आघाडी...

या विरोधात नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष (District Chief) बाबा गुजर यांना निवेदन दिले.
Hingna Nagar Panchayat NCP
Hingna Nagar Panchayat NCPSarkarnama

हिंगणा (जि. नागपूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग यांनी पुरुषोत्तम चौधरी यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यावे, असे सुचविले होते. मात्र गटनेते गुणवंता चामाटे यांनी त्यांची सूचना डावलून प्रवीण घोडे यांना निवडले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते संतापले असून तिसरी आघाडी तयार करण्याची तयारी चालवली आहे.

नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकमत झालेल्या उमेदवाराला बाजूला सारून गटनेत्याने मनमानी भूमिका स्वीकारली. या विरोधात नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष (District Chief) बाबा गुजर यांना निवेदन दिले. हिंगणा नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी मंत्री (Former Minister) रमेशचंद्र बंग यांच्या पक्षातील ज्येष्ठ व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार पुरुषोत्तम चौधरी यांना स्वीकृत नगरसेवक बनविण्याचे सर्वानुमते ठरविले. गटनेते गुणवंता चामाटे यांनी एकाकी भूमिका घेत प्रवीण घोडे यांना नगरसेवक (Corporator) करून पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या आदेशाचा अवमान केला. याप्रकरणी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या गटनेत्याचा व स्वीकृत नगरसेवक प्रवीण घोडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी भूमिका घेतली. पक्षाने या प्रकरणी तातडीने तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी हिंगण्यातील नाराज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्याकडे केली आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम चौधरी, संजय बनसोड, मंगेश भाकरे, आशिष पुंड,मनोज भाकरे, ताराचंद शेंडे ,राहुल पुंड, प्रमोद कावळे, सुधाकर शेळके, नितीन गोल्हर, प्रमोद कावळे, दिनेश सोनक, अमोल देशमुख, अभय हिंगणेकर, मुरलीधर जीवनकर, महेश पांडे, प्रेम सावरकर, विकास पुंड,मंगेश वानखेडे, बंटी उईके, तुषार गुंडरे, भीमराव मोडक, सुरेश शेंडे, शेंडे गौतम ताती, अवधूत काळे, रोशन भाकरे यांचा समावेश होता.

Hingna Nagar Panchayat NCP
हिंगणा ठरतोय हॉटस्पॉट, जिल्हाधिकाऱ्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान 

राजीनामा न घेतल्यास तिसरी आघाडी..

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून पुरुषोत्तम चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र गट नेत्याने हा निर्णय नाकारून स्वतःच्या मर्जीतील प्रवीण घोडे यांना स्वीकृत नगरसेवकपदी निवडून आणले. यामुळे आता जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी दोघांचेही राजीनामे घ्यावे. अन्यथा तिसरा पर्याय शोधण्याचा सज्जड इशारा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com