स्वबळाची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना राष्ट्रवादीने दिला झटका...

नानांना आता गृहजिल्ह्यात ‘होमवर्क’ वाढवावा लागणार आहे. पण रोखठोक आणि बिनधास्त असलेले नाना पटोले (Nana Patole) या अनुभवानंतर तरी गंभीर होतील का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

भंडारा : स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा या त्यांच्या गृहजिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलाच झटका दिला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीत आपल्या परंपरागत मित्राला सोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत वेगळी चूल मांडली, अन् तोंडाशी आलेला घास काँग्रेसकडून हिसकावला गेला.

नानांना आता गृहजिल्ह्यात ‘होमवर्क’ वाढवावा लागणार आहे. पण रोखठोक आणि बिनधास्त असलेले नाना पटोले (Nana Patole) या अनुभवानंतर तरी गंभीर होतील का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. आधी कोरोना आणि नंतर ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) तिढा सोडवत तब्बल २ वर्षांनंतर काल भंडारा जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या सभापती- उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. काॅंग्रेस (Congress) आपला परंपरागत पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करेल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परंपरागत मित्र काँग्रेसला डावलून भाजपसोबत ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ केले.

राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून जिल्ह्यातील काही पंचायत समितींमध्ये सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे मागील टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास मदत करूनही ‘बांधकाम सभापती पद न मिळाल्याने राष्ट्रवादी पक्ष नाराज होता. त्याचाच वचपा राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापती निवडणुकीत काढल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात ७ पैकी ४ पंचायत समितींवर राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तर काँग्रेसला दोन तर भाजपला एका पंचायत समितीवर समाधान मानावे लागले.

भंडारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले मोहन पंचभाई यांच्या पवनीसारख्या पंचायत समितीमध्ये सर्वाधिक पदे मिळालेल्या काँग्रेसला जाणूनबुजून सत्तेबाहेर ठेवण्याचे राष्ट्रवादीने प्रयत्न केल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती निवडणुकीपूर्वी नाना पटोले जिल्ह्यात छुप्या रीतीने गाठीभेटी करून गेले असतानाही काँग्रेसची जिल्ह्यात झालेली नामुश्की खूप काही सांगू जात आहे. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वबळाचा नारा भोवल्याचे बोलले जात आहे.

Nana Patole
तर राज ठाकरेंवरही पोलिस कारवाई करतील...नाना पटोले

दुसरीकडे नाना पटोले यांचे जिल्ह्यात लक्ष कमी असल्याची ओरड स्वतः काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. जिल्ह्यात इतकी मोठी निवडणूक असताना नाना पटोले गंभीर असू नये, ही गोष्ट ही पचणारी नाही. तरी या पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर नाना पटोले यांना गृह जिल्ह्याच्या बाबतीत गंभीर होणे गरजेचे आहे. अन्यथा राज्य काबीज करायला गेले अन् स्वजिल्ह्याला मुकले, असे होऊ नये एवढेच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com