प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंना धक्का! भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन

Gondia | District Council | ZP : दुसरा क्रमांकाचा पक्ष काँग्रेस विरोधी बाकांवर
प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंना धक्का! भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन
Prafull Patel Latest News in Marathi, Nana Patole Latest News in MarathiSarkarnama

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्र येत युती केली अन् काँग्रेसला जोरदार धक्का दिला. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही काँग्रेसवर (Congress) आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. (Prafull Patel Latest News in Marathi)

आधी कोरोना नंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा अशा सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत तब्बल २ वर्षांनंतर गोंदिया जिल्हा परिषदेची (ZP) निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. त्यानंतर १५ दिवसांत अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने अध्यक्ष व सभापती पदासाठी निघालेले पूर्वीचेच आरक्षण कायम ठेवायचे की नव्याने आरक्षण काढायचे, यावर जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाचे मार्गदर्शन मागविले होते. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही ग्रामविकास विभागाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

Prafull Patel Latest News in Marathi,  Nana Patole Latest News in Marathi
वसंत मोरेंची पुन्हा दांडी! एकला चलो रे भूमिकेनं मनसेचं वाढलं टेन्शन

परिणामी निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांनी ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर २२ एप्रिल रोजी न्यायालयाने शासन आणि निवडणूक विभागाला ७ जून पूर्वी अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा, असे मौखिक आदेश दिले आणि जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लगबगीने जि. प. अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिसूचना जारी केली. त्यानंतर आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला बाजू ठेवत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र सत्ता स्थापन केली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

Prafull Patel Latest News in Marathi,  Nana Patole Latest News in Marathi
"राज्यात दंगली घडविण्याचा काहींचा कट" : जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

भाजपचे सर्वाधिक बलाबल :

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक २६ सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, चाबीचे ४ आणि २ अपक्ष असे सदस्य विजयी झाले आहेत. यात भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत युती केली अन् सत्ता स्थापन केली आहे. या युतीला भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष आणि अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या ४ जागा असलेल्या गटाची साथ मिळाली. हे चार जण चावी या चिन्हावर निवडून आले आहेत. यामुळे गोंदियात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांना प्रफुल्ल पटेलांचा जबर धक्का मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.