सत्तारांचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द; मुख्यमंत्र्यांचे थेट कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आदेश?

Abdul Sattar News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.
Eknath Shinde, Abdul Sattar Latest News
Eknath Shinde, Abdul Sattar Latest NewsSarkarnama

Abdul Sattar News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिकेनंतर सत्तार वादात सापडेल आहेत.

राष्ट्रवादीने आक्रमक होत, सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केले. या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला.

Eknath Shinde, Abdul Sattar Latest News
अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, तर भाजप महिला नेत्यांची सावध प्रतिक्रिया...

सत्तार हे आज (ता. 8) सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. मात्र, राष्ट्रवादीने राज्यभरात ठिकठिकाणी सत्तारांचा निषेध केला आहे. तसेच बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळेच सत्तार यांचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी अब्दुल सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. तसेच आज सत्तार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात आल्याने राष्ट्रवादीने आक्रमक इशारा दिला होता. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

Eknath Shinde, Abdul Sattar Latest News
राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर; सत्तारांच्या अडचणी वाढणार

त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही सत्तार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना आठ दिवस कुठल्याच सावर्जनिक ठिकाणी न जाण्याची सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com