
Gadchiroli District Naxalite Movement News : कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्ती येथील घनदाट जंगलात रविवारी (ता. ३) राज्य राखीव पोलिस दल व ग्यारापत्ती पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान तीन जुन्या बनावटीच्या भरमार बंदुका आढळून आल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तीन बंदुका जप्त केल्या आहेत. मात्र या बंदुका कुणाच्या हे अद्याप कळू शकले नाही. (It is not yet known who owns these guns)
जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात एका झोपडीत आढळलेल्या तीन जुन्या पद्धतीच्या भरमार बंदुका नेमक्या कोणाच्या, याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्या नक्षलवाद्यांच्या असल्याचा कयास बांधल्या जात असला, तरी नक्षलवादी असे बंदुका सोडून जातात का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अनेक लोकांकडे अशा पद्धतीच्या बंदुका असल्याची माहिती आहे. अलीकडे पोलिसांच्या (Police) आवाहनानुसार बऱ्याच लोकांनी त्या बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत. मात्र अजूनही अनेक लोकांकडे बंदुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाच्या संयुक्त गस्तीदरम्यान या बंदुका दिसल्या.
या बंदुका आढळल्यामुळे परिसरात नक्षलवादी (Naxal) असण्याची शक्यता व्यक्त करत शोधमोहीम तीव्र करण्यात आली, पण कोणीही आढळले नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास सुरू असून ज्याच्या झोपडीत या बंदुका मिळाला त्याअनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली.
मागील महिन्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी- ६० पथकातील २०० जवान व डीआरजीच्या ७० कमांडोंनी मिळून हे अभियान राबविले होते.
त्यानंतर परिसरात नक्षली हालचाली झालेल्या नाहीत. पण तीन भरमार बंदुका सापडल्यामुळे तशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या बंदुका नक्षलवाद्यांच्या असतील, असे वाटत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही ज्या झोडपीत बंदुका सापडल्या तेथून चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.