Naxalite Attack : छत्तीसगड सीमेवर नक्षल-पोलिस चकमक, दोन जवान शहीद, मोटरसायकलही जाळली !

Gondia : राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव या दोन जवानांसोबत त्यांचा एक मित्र होता.
Naxal Attack
Naxal Attack Sarkarnama

Naxalite Attack on Maharashtra-Chhattisgarh state border : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज सकाळी ०८.३० वाजेताच्या सुमारास १० ते १२ च्या संख्येने असलेल्या महिला पुरुष नक्षलवाद्यांच्या टोळीने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान ठार झाले, तर एक जण जखमी झाला.

हल्ल्यादरम्यान नक्षलवाद्यांनी मोटरसायकलही जाळून टाकली. प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी ०८.३० वाजताच्या सुमारास बोरतलाव परिसरात तीन पोलिस जवान चहा पिण्यासाठी एका ढाब्यावर गेले होते.

राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव या दोन जवानांसोबत त्यांचा एक मित्र होता. तिघेही मोटरसायकलने चहा पिण्याकरीता चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले. तेथे १० ते १२ च्या संख्येने नक्षलवादी दबा धरून बसले होते.

चहा पिऊन लवकर परत यायचे असा विचार करून हे तिघेही ढाब्यावर गेले होते. त्यामुळे त्यांनी शस्त्र सोबत बाळगले नव्हते. ढाब्यावर नक्षलवादी दबा धरून बसले होते. जवानांना काही कळायच्या आतच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला. त्यानंतर नक्षल्यांच्या टोळीने त्यांच्या मोटारसायकलला आग लावली. त्यानंतर ही टोळी पसार झाली. या घटनेनंतर गोंदिया पोलीस व छत्तीसगड पोलीस जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सद्यस्थितीत पोलिसांच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती आहे.

Naxal Attack
तीन राज्य मिळून केली नक्षल्यांनी नवीन झोनची स्थापना; नक्षल संघटनेच्या बळकटीकणाचा प्रयत्न

शस्त्र असते तरीही...

नक्षली (Naxal) हल्ल्याच्या वेळी पोलिसांकडे (Police) शस्त्र नव्हते. पण शस्त्र असते तरीही तीन जवान १० ते १२ जणांच्या टोळीसमोर किती वेळ टिकले असते, असाही एक प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

कारण जवानांकडे शस्त्र (weapon) असते तरीही नक्षल्यांची टोळी आधीच ढाब्यावर दबा धरून बसली होती आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना प्रतिकार करायला थोडा वेळ तरी लागला असता. त्यामुळे शस्त्र असते तरीही ते किती वेळ लढा देऊ शकले असते, अशी चर्चा घटनेनंतर ऐकायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in