नवनीत राणांचे 'लव जिहाद'चे आरोप खोटे, पोलिस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या...

Navneet Rana : साताऱ्यात मुलगी रेल्वेमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathisarkarnama

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि भाजपाच्या (BJP) अनेक नेत्यांनी कथित 'लव जिहाद' प्रकरणावरून अमरावती पोलिसांवर (Police) गंभीर आरोप केले आहेत. खासदार राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारत पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला.

यानंतर आता स्वतः अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी या प्रकरणावर पोलिसांच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली असून संबंधित मुलगी ही स्वतः घरातून निघून गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे राणा यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. (Navneet Rana Latest News in Marathi)

Navneet Rana Latest News in Marathi
मित्रपक्षांची उणीव भरून काढण्यासाठी भाजपचा 'प्लॅन' तयार..'या' पंचसुत्रीवर कामही सुरू

पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या की, "ही मुलगी पुण्यात होती. मात्र आता ती पुण्यातून रेल्वेने साताऱ्याकडे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. साताऱ्यात ती रेल्वेमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्यावेळी ती एकटीच होती आणि सुखरुप होती,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पोलिसांनी तिचा प्राथमिक जबाब नोंदवला असून त्यात मुलीने एवढंच सांगितलं की, ती स्वतः रागाच्या भरात घरातून निघून गेली. दरम्यान मुलगी अमरावतीत आल्यावर आम्ही तिचा तपशीलवार जबाब नोंदवू,” असेही आरती सिंग यांनी स्पष्ट केलं.

Navneet Rana Latest News in Marathi
संजय राऊतांना उद्धव ठाकरे भेटू शकतात,पण...

दरम्यान, मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याप्रकरणी काल खासदार राणा आणि काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्या थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली होती.

मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार राणा या अमरावती पोलिस ठाण्यात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता. पोलिस रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काहीच समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबतही उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपही राणांनी केला होता. यावर आता पोलिसांकडून प्रतिक्रिया आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com