पोलीस पत्नी नवनीत राणांवर बरसल्या : थेट आमरण उपोषणाचा इशारा

Navneet Rana : कोणताही गैरप्रकार घडला नाही, माझी बदनामी थांबवा, असे संबंधित मुलीने सांगितले आहे.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. राणांनी फोन रेकॉर्डिंगवरूनही पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला, पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला होता. मात्र पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मुलगी सातारा येथे आढळून आली. राजा पेठ पोलिसांनी मुलीकडून जबाब नोंदवून घेत, तिला आई-वडिलांकडे सुपूर्द केलं. संबधित मुलीने तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचं स्पष्ट केले आहे. मला कोणीही जबरदस्तीने पळवून नेले नाही, माझी बदनामी थांबवा, असे त्या मुलीने सांगितले आहे. यामुळे आता नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये हुज्जत घालत, तावातावाने पोलीसांवर केलेल्या आरोपांवर तोंडघशी पडल्या आहेत. यामुळे आता पोलिस पत्नी हे नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.

नवनीत राणा यांनी पोलिसांवर लावलेल्या खोट्या आरोपांबद्दल जाहीर माफी मागितली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा पोलिस पत्नीने दिला आहे. येत्या दोन दिवसात जर नवनीत राणा यांच्याकडून माफी आली नाही तर आपण आमरण उपोषण करणार असल्याचे पोलिस पत्नीने जाहीर केले.

Navneet Rana
hindu-muslim politics|नवनीत राणा तोंडघशी पडल्या; बेपत्ता तरुणी म्हणाली, माझी बदनामी थांबवा...

आरोप खोटे आहेत हे स्पष्ट होऊनही जर नवनीत राणा माफी मागत नसतील तर त्या निर्लज्ज बाई आहेत. राजकारणात नौटंकी चालत नसते. राणांनी आरोप केल्यामुळे संबधित मुलीची बदनामी झाली आहे. हे कोणत्याही सुशिक्षित महिलेचं लक्षण नाही, असेही पोलिस पत्नी म्हणाल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी संबंधित तरुणीला पळवून, आंतरधर्मीय विवाह करण्यास भाग पाडल्याचा आणि तिला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला होता. काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्या थेट राजा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली होती.

मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला? या मुद्द्यावर खासदार राणा या अमरावती पोलिस ठाण्यात पोलिसांशी वाद घातला. पोलिस रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काहीच समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबतही उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपही राणांनी केला होता. मात्र आता संबंधित मुलगी समोर आल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in