Navneet Rana| तुमचा माज कमी करा; पोलिस पत्नीने खासदार नवनीत राणांना झापलं...

Navneet Rana| Amaravati Police| नवनीत राणांनी पोलिस स्टेशनमध्ये राडा करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.
Navneet Rana| Amaravati Police|
Navneet Rana| Amaravati Police|

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती पोलीस स्टेशनमध्ये राडा घातल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले. १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत या मुद्द्याला लव्ह जिहाद चे वळण दिले. इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. याशिवाय फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारत पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला.

या घटनेनंतर मुलीने शोध घेतल्यानंतर रागाच्या भरात मुलगी घर सोडून निघून गेल्याची माहिती समोर आली . तसेच संबंधित मुलीनेही खासदार राणा यांनी आपली बदनामी थांबवावी अशी मागणी केली. या घटनेनंतर आता पोलीसांचे कुटूंबीयदेखील नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये घातलेल्या राड्याबद्दल आणि पोलिसांवर केलेल्या आरोपांवरुन संबंधित पोलिसांच्या पत्नीने नवनीत राणा यांना झापलं आहे.

Navneet Rana| Amaravati Police|
hindu-muslim politics|नवनीत राणा तोंडघशी पडल्या; बेपत्ता तरुणी म्हणाली, माझी बदनामी थांबवा...

पोलीस पत्नी वर्षा भोयार म्हणाल्या की, गेल्या कित्येक दिवसांपासून खासदार मॅडम पोलिसांच्या कामकाजावर आक्षेप घेत आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की, जर तुमच्या हातात एवढीच पॉवर आहे, एवढी केंद्रीय खाती तुमच्या हातात आहेत, तुमचे वरिष्ठ नेते तुमच्या हातात आहेत. तर मी तुम्हाला एवढीच विनंती करते की ज्या पोलिसांचा तुम्ही एवढा राग करता तर तुमच्याजवळ असलेले पोलिस संरक्षण काढून टाका. तुम्हाला ते संरक्षण घेण्याचा अधिकार नाही, तुमच्या मागे जे पोलीस कर्मचारी आहेत. ते शासनाचे आहेत. पोलिस अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहचले आहेत. तुमच्यासारखे किराणा वाटून पोहचलेले नाहीत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोलीस संरक्षण लागतं. पण कालची काय भाषा आहे तुमची पोलीसांशी बोलायची, तुम्हाला गरज नसेल तर ते पोलिस संरक्षण काढून टाका, आज पोलिस पत्नी म्हणून बोलते आम्हाला माहिती आहे, कर्तव्य बजावताना ते कधीही, कोणत्याही सणाला आमच्यासोबत नसतात, आम्ही कशा प्रकारे समाजाचा सामना करतो, आमच्या अडअचणी दुर करतो ते आमचं आम्हाला माहितीये.

प्रत्येक वेळी पोलीस संरक्षण करता ना, तर कधी हेच पोलीस संरक्षण बाजूल करुन पहा आणि जनतेत येऊन दाखवा, मग तुम्हाला समजेल पोलीस नसल्यावर काय होतं ते. तुम्ही तुमचा माज कमी करा, स्वत: ला जनप्रतिनीधी म्हणवून घेता ना तर जनप्रतिनीधीची भाषा प्रेमाची असली पाहिजे, सौम्य असली पाहिजे ते राजपत्रित अधिकारी आहेत, या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना कितीतरी मेहनत करावी लागली आहे. त्या पदाचा काहीतरी मान आहे. तो तुम्हीही राखला पाहिजे.'' अशा शब्दांत पोलीस पत्नी वर्षा भोयार यांनी खासदार राणांना अक्षरश: झापलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in