Narendra Modi रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेमध्ये जातात, कॉंग्रेसचे नेते आकडे देऊ शकतात का ?

Shinde-Fadanvis : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी झाला.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama

BJP National President J. P. Nadda News : गेल्या महिन्यात ११ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नागपुरात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. ते येथे रिपोर्ट कार्ड घेऊन आले होते. मोदी नेहमी जनतेमध्ये रिपोर्ट कार्ड घेऊन जातात, पण कॉंग्रेसचे नेते असं करू शकतात का? आमच्यासारखे आकडे ते देऊ शकतात, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केला.

विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाड्यातील संभाजीनगर येथे त्यांच्या जाहीर सभा आहेत. त्यांपैकी चंद्रपुरात (Chandrapur) त्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. नड्डा म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी आघाडीची पिछाडी सरकार होती, पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे (Devenda Fadanvis) सरकार आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी झाला आणि विकासाच्या कामांनी वेग धरला. मोदी जेव्हा नागपुरात (Nagpur) आले होते, तेव्हा त्यांनी ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. रेल्वेला १,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प दिला. नाग नदीसाठी १,९२५ कोटीचा प्रकल्प, वंदे भारत ही नागपूर-विलासपूर रेल्वेगाडी सुरू केली.

नागपुरात मेट्रो फेज हा १८,६५० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला. ६,७०० कोटी रुपयांच्या मेट्रो फेज टू प्रकल्पाचे भूमिपूजन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटर अंतराच्या नागपूर ते शीर्डीचे उद्घाटने केले. एक्सप्रेस हायवेसाठी ५५ हजार कोटी रुपये मंजूर केले. कॉंग्रेसचे नेते असे आकडे देऊ शकतात काय? मोदी रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेमध्ये जातात. गेल्या महिन्यात १८ तारखेला १,८०० कोटी रुपयाच्या राज्यातल्या पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला मंजुरी मिळाली. यामध्ये अंदाजे २,००० कोटी रुपये खर्च होणार असून ५ हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. तर ५० हजार लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे, असे नड्डा म्हणाले.

महाराष्ट्र मॅगनेटीक आहे. या राज्यात विदेशातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. ३,७५,००० कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. चंद्रपूरला मेडिकल कॉलेजची मान्यता दिली. जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब आहे. चंद्रपूर हा आदिवासीबहुल भाग आहे. सिकलसेल या आजाराचा मुद्दा सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला. मोठे रिसर्च सेंटर चंद्रपुरात बनत आहे. २००० कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात झाली आहे. नागपुरात एम्स येईल, असे येथील जनतेला कधी वाटले नसेल, पण ते करून दाखवले. आता विदर्भातील लोकांना इतरत्र जायची गरज नाही, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

J. P. Nadda
जे.पी. नड्डा म्हणतात, दिलेला शब्द पाळणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष...

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, बंटी भांगडीया, संजीवरेड्डी बोदकुरवार संदीप धुर्वे, देवराव होळी, समीर कुणावार, अशोक उईके, कृष्णा गजबे यांच्यासह धर्मपाल मेश्राम, चंदन व्यास, नितीन फुतडा, अतुल देशकर, संजय धोटे, राजेश बकाने, जमान सिद्दीकी, अर्चना डेहनकर, किसन नागदेवे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in