नारायण राणेंचे वक्तव्य म्हणजे रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरी…

टिका, विरोध करणारे आपले काम करतच आहे. पण मुख्यमंत्री विवेकाने आपले काम करून महाराष्ट्राला समोर नेण्याचे काम करीत आहे, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.
नारायण राणेंचे वक्तव्य म्हणजे रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरी…
Bacchu KaduSarkarnama

अकोला : मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सर करू शकत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे नुकतेच केले होते. त्यावर राणेंच्या ८ महिन्यांचा कार्यकाळ आता तपासावा लागेल, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणेंच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

याबाबत माध्यमांशी बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना नारायण राणे यांनी त्यांची लायकी काय आहे, हे स्वतःच कबूल केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अतिशय प्रामाणिक नेतृत्व आहे. अत्यंत सात्त्विक असे मुख्यमंत्री आपल्याला भेटलेले आहेत. त्यामुळे नारायण राणेंची बरोबरी हे मुख्यमंत्री करूच शकणार नाहीत, हे त्यांचे म्हणणे अगदी योग्य आहे. उशिरा का होईना, हे सत्य राणेंनी ओकले, हे चांगले झाले. महाराष्ट्राच्या जनतेलाही हे आता कळून चुकले आहे.

संत ज्ञानेश्‍वर काळात रेड्याने ज्ञानेश्‍वरी म्हटली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी तसेच आता या रेड्याने (नारायण राणे) सत्य ओकले आहे. मी मुख्यमंत्र्यांची सर करू शकत नाही, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो. आत्ताच काय केव्हाही राणे उद्धव ठाकरेंची बरोबरी करू शकणार नाही आणि त्यांनी ते स्वतः मान्य केले, ही गोष्ट चांगली झाली. टिका, विरोध करणारे आपले काम करतच आहे. पण मुख्यमंत्री विवेकाने आपले काम करून महाराष्ट्राला समोर नेण्याचे काम करीत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu
'लाज वाटत नाही का तुम्हाला?'; बच्चू कडूंनी राणा दांपत्याची लाज काढली....

हल्लीच्या राजकारणामध्ये काही राजकारण्यांना जनतेच्या समस्यांशी, त्यांच्या कामांशी काही देणघेणं राहिलेले नाही. केवळ आणि केवळ राजकारण त्यांच्या डोक्यात २४ तास असते. हे करताना जनतेशी आपण बांधील आहो, समाजाचंही आपण काही देणं लागतो, ही बाब काही राजकारणी सपशेल विसरले आहेत. त्यामुळे राज्याचे मूळ प्रश्‍न तसेच खितपत ठेवून फालतुच्या गोष्टी उकरून अत्यंत खालच्या स्तरावर राजकारण केले जात आहे. पण जनता सर्व बघत आहे आणि योग्य वेळी अशा राजकारण्यांना उत्तर देईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in