Nana Patole News: घोडेबाजाराला आला जोर, नाना पटोले ठरवणार लाखांदूर बाजार समितीचा शिलेदार !

Bhandara APMC News: तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे.
Nana Patole
Nana PatoleSakarnama

Bhandara District's Lakhandur APMC News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणजे लाखांदूर तालुका. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. पक्ष विरहित पार पडलेल्या या निवडणुकीनंतर मात्र सभापती व उपसभापती पदासाठी घोडेबाजाराला वेग आला आहे. (BJP-NCP alliance was formed in this election)

काँग्रेस प्रणीत पॅनलचे ११ तर भाजप - राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थीत पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सभापती, उपसभापती काँग्रेस समर्थीत पँनलमधूनच होणार की सुनील फुंडे आणि डॉ. परिणय फुके आपला गनिमी कावा वापरत पटोलेंना लाखनी बाजार समितीसारखी धोबीपछाड देणार काय, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. लाखांदूर बाजार समिती नवा शिलेदार कोण, हा आता तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे.

१८ जागांपैकी काँग्रेसला ११ तर भाजपला सात जागा काबीज करता आल्या. या निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी युती झाली, तर काँग्रेस स्वबळावर लढली आहे. शेतकरी व मतदारांनी आपला हिसका दाखवीत काही बाजार समितीतील प्रस्थापित मातब्बरांना घरचा रस्ता दाखवून थेट शेत, शिवाराशी नाळ जुळलेल्या नव्या दमाच्या लोकांना संधी दिली आहे. निवडणुकीसाठी मतदारांना मुक्तहस्ताने ‘लक्ष्मी’ वाटप करावे लागल्याने निवडून आलेले सदस्यही आता ‘लक्ष्मी’ दर्शनालाच अधिक महत्त्व देण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदावर आपलाच गडी बसावा म्हणून घोडेबाजाराला भलताच जोर आला आहे. वर्षाकाठी अडीचशे, तीनशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या लाखांदूर बाजार समितीच्या चाव्या कुणाच्या हातात जातात, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. लाखांदूर तालुक्यात नव्हे तर साकोली विधानसभा क्षेत्रात जातीपातीचे राजकारण होत असल्याचे पाहायला मिळत असून, त्यात कुणबी समाजातील झाडे विरुद्ध खेडुले अशी रंगत होत असते.

Nana Patole
Nana Patole On Karnataka Election Result जनतेने Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाला स्विकारलं|Sarkarnama

बाजार समितीत संचालक म्हणून विजयी झालेल्या १८ उमेदवारांपैकी एकाच्या गळ्यात सभापती तर दुसऱ्याच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ घातली जाणार आहे. सगळ्यांची मोट बांधल्याशिवाय सभापतिपदाला गवसणी घालणे अशक्य आहे. ही मोट बांधण्यासाठी आता दोन्ही गटांचे श्रेष्ठी कामाला लागले आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांकडून सभापतिपदासाठी दावेदारी केली जात असली, तरी सगळेच गणित मात्र वैयक्तिक करिश्‍म्यावर अवलंबून आहे.

निवडून आलेल्या १८ संचालकांमध्ये लोकेश भेंडारकर, सुरेश ब्राम्हणकर, ज्ञानेश्वर बुरडे, मनोहर राऊत, सुभाष राऊत, प्रमोद प्रधान, रजनी घोरमोडे, प्रतिभा देशमुख, डेलीस ठाकरे, तेजराम दिवटे, देवीदास पारधी, रामभक्त मिसार, अविनाश शिवणकर व प्रकाश चुटे या संचालकांचा समावेश आहे. तर मारवाडी समाजातून मुकेश भैय्या, ढिवर समाजातून मनोज मेश्राम व प्रकाश शिवणकर असे दोन तर अनुसूचित जातीतून ओमप्रकाश सोनटक्के एक असे १८ संचालक आहेत. खेडुले कुणबी समाजाने बहुसंख्य असलेल्या या बाजार समितीवर आत्तापर्यंत आत्तापर्यंत वर्चस्व राखले आहे. त्यामुळे बहुमत असलेली काँग्रेस कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घालते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Nana Patole
Ajit Pawar यांना सलाम, असे का म्हणाले Nana Patole ? | Congress | NCP | Sarkarnama Video

पटोले ठरविणार शिलेदार..

बाजार समिती सभापतिपदी कोणाला आरूढ करायचे, हा निर्णय स्थानिक आमदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) घेणार आहेत. लाखांदूर तालुका हा नाना पटोलेंचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Election) काँग्रेसला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा, लोकसभा निवडणूक लक्षात घेता तालुक्यात आपली मुळे मजबूत करण्याची गरज आहे. बाजार समिती सभापतिपदी शिक्षित व तालुक्याचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तीची निवड करावी लागणार आहे.

पाच नावांची चर्चा..

बाजार समिती सभापतिपदासाठी काँग्रेसकडून (Congress) लोकेश भेंडारकर, मनोहर राऊत, सुरेश ब्राम्हणकर, देवीदास पारधी, सुभाष राऊत यांची नावे चर्चेत आहेत. या उमेदवारांमध्ये मनोहर राऊत हे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. डॉ. सुरेश ब्राम्हणकर हे उच्चशिक्षित असून यापूर्वी बाजार समितीचे संचालक राहिले आहेत. सुभाष राऊत हे देखील बाजार समितीचे सभापती राहिले आहेत. मात्र या लोकांनी बाजार समितीत पाहिजे समाधानकारक काम केले नाही. त्यामुळे काँग्रेसला बाजार समिती निवडणुकीत (APMC) तारेवरची कसरत करावी लागली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com