आमचे गुडलक सोबत म्हणून तुम्ही सत्तेत; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना सूचक इशारा

महापालिकेत काँग्रेसची (Congress) सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही
Aditya Thackeray, Nana Patole
Aditya Thackeray, Nana Patolesarkarnama

भंडारा : आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा सूचक इशारा काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते पर्यनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नाना पटोले भंडाऱ्यामध्ये माध्यमांशी बोलत होते. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी नागपूरात केले होते. त्यावर त्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहेत. आता ते सोबतच आहेत त्यामुळे बघुया त्यांचे गुडलक कामाला येतेय का? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी पटोले यांना लगावला होता.

Aditya Thackeray, Nana Patole
'पवार साहेबांनी माझी तक्रार केली असेल तर मला आनंदच आहे!'

पटोले म्हणाले, आदित्य ठाकरे यांना जे मत मांडले आहे. ते काँग्रेसच्याच बाजूचे आहे. आमचे गुडलक त्याच्याबसोत आहे, म्हणून ते सत्तेत आहेत. त्याच बरोबर पटोले यांना राज्यसभा निवडणुकी बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप बैठक झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या कोटा ठरलेला आहे. त्यामुळे आमचा एक-एक सदस्य निवडून योतो. मात्र, 6 व्या जागेबाबत अजुन ही बैठक झाली नाही. बैठक झाल्यावर भूमिका ठरवू, पटोले यांनी सांगितले.

Aditya Thackeray, Nana Patole
निवडणूक आली अन् पुन्हा चर्चा सुरू झाली कॉंग्रेस-वंचितच्या युतीची...

दरम्यान, पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याचे संकेत दिले जात असून त्या संदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शरद पवार साहेबांनी माझी तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली असेल, तर मला आनंद आहे. हे छान झाले, मी शरद पवार साहेब आणि काँग्रेस हायकमांड असे तिघे बसुन महाराष्ट्रासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असा टोला पटोले यांनी लगावाल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com