Ashish Deshmukh-Nana Patole
Ashish Deshmukh-Nana PatoleSarkarnama

Deshmukh Vs Patole : पटोलेंनी विधानसभेचे अध्यक्षपद कोणालाही न विचारता संशयास्पदरित्या सोडले : आशिष देशमुखांना पुन्हा हल्लाबोल

तेव्हाच माझी संशयाची सूई नाना पटोले यांच्यावर गेली होती. त्यासंदर्भातही ही स्पष्टीकरणात उल्लेख करणार आहे.

नागपूर : संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची गैरहजेरी, नागपूरमधील महाआघाडीच्या वज्रमूठ सभेत खोडा घालून राहुल गांधी यांची त्यानंतर दोन-चार दिवसांत सभा घेणे, हे सर्व षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राची सुरुवात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन केली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद कोणालाही न विचारता अतिशय संशयास्पदरित्या सोडले, असा हल्लाबोल आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर केला. (Nana Patole suspiciously quit as Speaker of Vidhan Sabha without asking anyone : Ashish Deshmukh)

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर आशिष देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून मला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. विशेषतः दोन मुद्यांवर त्यांनी माझ्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबतची कार्यवाही होईपर्यंत मला पक्षाकडून निलंबित करण्यात आलेले आहे. माझ्या स्पष्टीकरणानंतर समिती आपला निर्णय घेणार आहे.

Ashish Deshmukh-Nana Patole
Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

मी दोन विषयाच्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यात पहिले म्हणजे राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागावी. आजपर्यंत मी जी काही भूमिका घेतलेली आहे, ती काँग्रेस पक्षाच्या हिताचीच घेतली आहे. ओबीसी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या हिताची कोणी भूमिका घेत असेल तर त्याला नोटीस देणे हे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे. पण, शिस्तपालन समितीकडून मला नोटीस देण्यात आलेली आहे. मला विचारणा करण्यात आलेल्या मुद्यांवर मी सविस्तर असे उत्तर शिस्तपालन समितीला पाठविणार आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.

Ashish Deshmukh-Nana Patole
Solapur News : जत्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी लावली चक्क बोली : साठी पार केलेल्या शेतकऱ्याने मारली बाजी!

आशिष देशमुख म्हणाले की, दुसरा मुद्या असा आहे की, खोके, सूरत, गुवाहाटी आणि संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेला प्रांताध्यक्षांची गैरहजेरी, नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत खोडा घालून राहुल गांधी यांची त्यानंतर दोन-चार दिवसांत सभा घेणे, हे पक्षाच्या बाबत षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राची सुरुवात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन केली आहे. तेव्हाच माझी संशयाची सूई नाना पटोले यांच्यावर गेली होती. त्यासंदर्भातही ही स्पष्टीकरणात उल्लेख करणार आहे. ज्या दिवशी नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद कोणालाही न विचारता अतिशय संशयास्पदरित्या सोडले. त्यासंदर्भातही मी लेखी उत्तर देणार आहे.

Ashish Deshmukh-Nana Patole
Ashish Deshmukh Dismiss : अखेर आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित; कारणे दाखवा नोटीस बजावली..

मी काँग्रेस पक्षातच आहे. माझे हे म्हणणे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीला पटेल. ते काँग्रेसच्या हिताचे आहे, हे मान्य करून मला ते पक्षाबाहेर करण्याची कारवाई करणार नाहीत, असा विश्वास वाटतो, त्यामुळे इतरत्र कोणत्याही पक्षाकडे जाण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com