नाना पटोले म्हणाले, भाजपच्या गर्वाचे लवकरच हरण होईल...

लाखो लोक आमदाराला मोठ्या विश्‍वासाने विधानसभेत पाठवीत असतात. त्यामुळे कोणतेही आमदार अशा प्रकारची गडबड करतील, असे वाटत नाही, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
Nana Patole and Yashomati Thakur
Nana Patole and Yashomati ThakurSarkarnama

अमरावती : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सकाळपासून सुरू होत्या. मात्र विरोधी पक्षाने राज्य सरकारमधील मंत्र्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या निवडणुका होत आहेत. राज्यसभा, विधानपरिषद या निवडणुकी बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण भाजप ती मोडीत काढत आहे. या निवडणुकीत भाजपच्या गर्वाचे हरण होईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी आले असता माध्यमांशी ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची एक परंपरा आतापर्यंत होती. याही वेळी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) नेत्यांनी विरोधी पक्षाकडे जाऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पण विरोधी पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही परंपरा खंडीत करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आणि प्रचंड पैसा आहे, त्याचा गर्व त्यांना झालेला आहे. पण यावेळी त्यांचे गर्वहरण होण्याची वेळ आलेली आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

या निवडणुकीत ज्या पक्षाजवळ जेवढी संख्या आहे, त्या आधारावर उमेदवार निवडले गेलेले आहेत आणि यामध्ये मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो. चारही उमेदवारांच्या मतांचा कोटा महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे चारही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि भाजपच्या गर्वाचे हरण होईल. केंद्रीय तपास यंत्रणा आणि प्रचंड पैसा या जोरावर भाजप घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात आहे. काय काय होते आहे, ते लवकरच पुढे येणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराबाबत सध्याच काही बोलणे योग्य होणार नाही. पण या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे.

Nana Patole and Yashomati Thakur
नाना पटोले म्हणाले, संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार...

एक आमदार अडीच ते तीन लाख लोकांचे नेतृत्व करतो, त्या परिसराचे नेतृत्व करतो. लाखो लोक आमदाराला मोठ्या विश्‍वासाने विधानसभेत पाठवीत असतात. त्यामुळे कोणतेही आमदार अशा प्रकारची गडबड करतील, असे वाटत नाही, असेही पटोले यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्‍वास पटोलेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com