Nana Patole News: पटोलेंचा आरएसएसवर गंभीर आरोप, डॉ. मोहन भागवतांना केली ‘ही’ विनंती !

Dr. Mohan Bhagwat : भागवतांचे गुंड लोकांना समर्थन नसेल तर त्यांनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा.
Eknath Shinde, Devendra Fadanvis and Others
Eknath Shinde, Devendra Fadanvis and Others Sarkarnama

Nana Patole on Inauguration of National Cancer Institute : आज नागपुरात झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमात ललित टेकचंदानी नावाचे गृहस्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसत आहेत. टेकचंदानी यांनी लोकांना फसवले आहे, त्यावरून नाना पटोले यांनी संघावर गंभीर आरोप केले आहेत. (Is RSS a party of hooligans?)

यासंदर्भात आज (ता. २७) नाना पटोले म्हणाले, टेकचंदानी यांना संचालक बनवण्यात आले आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचे सांगतात. आजच्या कार्यक्रमात ते डॉ. मोहन भागवत यांच्या मागे उभे होते. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेतही ते वारंवार दिसले. आरएसएसमध्ये मोठ्या पदावर ते असतीलही. पण गेल्या १३ वर्षांपासून टेकचंदानी आणि त्यांच्या लोकांनी सदनिका देतो, असे सांगून हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

पैसे घेतले, पण त्यांना सदनिका दिल्या नाहीत आणि त्यांचे पेसैही परत केले नाहीत. असे लोक आरएसएसमध्ये आहेत. त्यामुळे ही एक गुंड्यांची पार्टी आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी केला. मोहन भागवत आरएसएसचे प्रमुख आहेत. सरकार याप्रकरणी न्याय देत नाही, कारण पोलिसांकडून साधी तक्रारही घेतली जात नाही. त्यामुळे डॉ. भागवतांनी या लोकांना न्याय द्यावा. खरंच त्यांचे जर अशा गुंड लोकांना समर्थन नसेल तर या पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती पटोलेंनी केली आहे.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज करण्यात येणार होते. पण ते न आल्यामुळे डॉ. भागवतांनी उद्घाटन केले. जनतेकडून लुटलेल्या पैशांतून आपण हे इमले उभे करत आहात का, असा सवालही पटोले यांनी केला. जनतेच्या मागे कॅन्सर लावून कॅन्सर इन्स्टिट्यूट उभे केले का, असाही सवाल पटोलेंनी केला. टेकचंदानी आजही पैसे परत न करता त्याच लोकांना धमकावत आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadanvis and Others
Nana Patole News : आमचं हिंदुत्व कुणा येऱ्या गबाळ्याचं नाही; नाना पटोले स्पष्टच बोलले

आजच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर ललित टेकचंदानी हा भाजप (BJP) आणि संघाच्या अगदी जवळचा माणूस आहे, हे लक्षात येते. जनतेचे पैसे लुटणाऱ्याला जर संघ संरक्षण देत असेल, तर मग संघ जनतेला लुटणारी संघटना आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी केला. मोहन भागवत यांनी या प्रकरणात लक्ष घालून पिडीत लोकांना न्याय दिला पाहिजे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हा सुसंस्कृत आणि धर्माच्या लोकांना न्याय देणारी संघटना आहे.

ज्या लोकांना फसवण्यात आले आहे, ते सर्व लोक हिंदू आहेत. त्यामुळे भागवतांनी (Dr. Mohan Bhagwat) या लोकांचे संरक्षण करावे, अशी मागणी पटोले (Nana Patole) यांनी केली. १३ वर्षांपासून या लोकांना घरं मिळाली नाहीत, भाड्याच्या घरात ते राहात आहेत. यातील काही लोक तर मरण पावले. आताही संघाने सकारात्मक भूमिका घेऊन या लोकांना न्याय दिला नाही, तर या गुंडाराजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा सहभागी आहे, असे म्हणावे लागेल, असेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com