नाना पटोले उद्या अमेरिकेच्या अध्यक्षांवरही बोलू शकतील…

मी Devendra Fadanvis आणि प्रवीण दरेकर Pravin Darekar उद्यापासून वाशीम जिल्ह्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय.
Devendra Fadanvis and Nana Patole
Devendra Fadanvis and Nana PatoleSarkarnama

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर द्यायचे नसते. कारण ते उठसूठ काहीही बोलत असतात. उद्या ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही आरोप करून काहीबाही बोलू शकतात, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. परमबीरसिंह यांना देशाबाहेर पाठवण्यात केंद्र सरकारचा हात आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यावर फडणवीसांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी फडणवीस आज नागपुरात आले. त्यावेळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ज्यावेळी राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा. जेव्हा राज्याचे प्रमुख किंवा मंत्री नैसर्गिक आपत्तीच्या पाहणीसाठी जातात, तेव्हा प्रशासन वेगाने कामाला लागते. मी आणि प्रवीण दरेकर उद्यापासून वाशीम जिल्ह्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जाणार आहोत आणि परिस्थिती पाहून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारच्या घोषणा हवेत विरल्या..

यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. जेवढ्या आपत्ती आल्या त्या संदर्भातल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ सर्व आपत्तीच्या वेळेला सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

Devendra Fadanvis and Nana Patole
अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू!

मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. त्या संदर्भात असा स्पेक्युलेशन करून बोलणं योग्य होणार नाही. मला यासंदर्भात कुठलीही माहिती नाही. माध्यमांच्या माध्यमातून चर्चाच केवळ ऐकली आहे. मात्र अधिकारिक माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे या विषयावर आता बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मुंबईचा सागरी हद्द आराखडा पूर्ण होतोय, याचा मला अतिशय आनंद होत आहे. आमचं सरकार असताना तो आराखडा मंजुरीसाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला होता. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत होतो. हा आराखडा मंजूर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना चालना मिळणार आहे. खास करून सिडकोच्या एरियामध्ये अनेक प्रकल्पांना आता चालना मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com