पटेल-पटोले वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा काँग्रेसचा इशारा

NCP | Congress | Nana Patole : नाना पटोले प्रफुल्ल पटेलांविरोधात आक्रमक
पटेल-पटोले वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा काँग्रेसचा इशारा
Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel Sarkarnama

भंडारा/गोंदिया : राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम काल (मंगळवार, १० मे) रोजी पार पडला. भंडाऱ्यामध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचा (Congress) तर गोंदियामध्ये भाजपचा (BJP) विजय झाला आहेत. मात्र यात भंडाऱ्यामध्ये काँग्रेसला मदत केली ती भाजपने आणि गोंदियामध्ये भाजपला मदत केली राष्ट्रवादी काँग्रेसने. (NCP) त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसनेच आघाडी धर्म गुंडाळून ठेवतं विरोधी पक्ष भाजपला साथ दिल्याचे किंवा सोबत घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

यावरुन आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. बेईमानी आमच्या रक्तात नाही मात्र भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला अशी जहरी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःला विकास पुरुष म्हणून मिरविणाऱ्या लोकांनी जिल्ह्यातील राजकारण गलिच्छ करुन टाकले आहे, असाही आरोप त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला आहे.

Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel
पटेल-पटोले वादाचा भाजपला फायदा; काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर

गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची (BJP) साथ दिली. तर भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली असे आरोप करत पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. याशिवाय पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकार केवळ भंडारा-गोंदियात ही नाही तर मालेगांव आणि भिवंडीतही केला असल्याच्या आरोप केला आहे. तसेच या सर्व प्रकराची माहिती व राष्ट्रवादीचे भाजपशी असलेल्या संबंधांची तक्रार दिल्लीला जावून हायकमांडला करणार असल्याचा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel
मी भाजपचा आमदार पण अजितदादा मला भरपूर निधी देतात : शिवेंद्रसिंहराजेंकडून जाहीर कौतूक

यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार पटलवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ट्वीट करत पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. चव्हाण आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''स्वतः पाठीत सुरा खुपसून चाकू दुसऱ्याच्या हातात दिल्याने गुन्हेगाराचा गुन्हा लपत नसतो. नाना पटोलेजी कोणी कोणाच्या पाठीत सुरा खुपसला हे महाराष्ट्र्र बघतोय.'' अशा शब्दांत चव्हाण यांनी पटोले यांना सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.