Balasaheb Thorat and Nana Patole
Balasaheb Thorat and Nana PatoleSarkarnama

नाना पटोले पंतप्रधानांबद्दल बोललेले नाहीत, आणि गावगुंड मोदी त्यांनी दाखवला...

यापेक्षाही जास्त चांगलं स्पष्टीकरण पाहिजे असेल, तर नानाभाऊ (Nana Patole) नागपुरातच राहतात, तुम्ही त्यांना विचारा, ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला सांगतील

नागपूर : आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल बोललेले नाहीत आणि ज्या मोदीबद्दल ते बोलले, तो मोदीसुद्धा त्यांनी दाखवून दिलेला आहे. मग आता शिल्लक काय राहिले. तुम्हाला यापेक्षाही जास्त चांगलं स्पष्टीकरण पाहिजे असेल, तर नानाभाऊ नागपुरातच राहतात, तुम्ही त्यांना विचारा, ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला सांगतील, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नागपूरच्या पत्रकारांना दिला.

बाळासाहेब म्हणाले, राजकारण हे तत्त्वांचं, विचारांचं असलं पाहिजे, व्यक्तिगत द्वेषाचं असू नये, एक राजकीय जीवनप्रणाली असली पाहिजे, या मताचा मी आहो. ओबीसी आरक्षणाची सद्यःस्थिती काय आहे, असे विचारले असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बैठक घेतली. या बैठकीला मी स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होती. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यही उपस्थित होते. बैठक अत्यंत चांगली झाली आणि सद्यस्थितीतील सर्व विषयांवर योग्य मार्ग निघणार आहे. सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat and Nana Patole
Video: वाळू स्वस्तात उपलब्ध होणार- बाळासाहेब थोरात

डेटा देणार की नाही, देणार असतील तर केव्हा द्यायचा, हा सर्वस्वी आयोगाचा अधिकार आहे. या विषयावर सर्वच जण सकारात्मक आहेत आणि ओबीसींचा न्यायहक्क त्यांना मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. अर्थमंत्री अजित पवार आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या खात्यांना जादा निधी देतात आणि इतरांवर अन्याय होतो. त्यामुळे अजितदादांवर कॉंग्रेसचे मंत्री नाराज आहेत का, असे विचारले असता बाळासाहेब म्हणाले की, एकाच पक्षाच सरकार जरी असलं तरी थोडीफार ओढाताण ही होतच असते. आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येकच पक्षाच्या मंत्र्यांना वाटते की आपल्या विभागाला जास्त निधी मिळाला पाहिजे आणि तशी मागणी ते करीत असतात. त्यामुळे या गोष्टी सरकारमध्ये चालतच असतात. त्यात नाराजीचा कुठेही विषय नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com