Lakhandur Market Committee: पटोलेंना 'होमपीच'वरच खिंडीत गाठण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेतलं,तरीही काँग्रेसनं मैदान मारलंच..!

Congress Vs BJP & NCP: भंडाऱ्यापाठोपाठ गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न पाहण्यास मिळाला.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Bhandara News : लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची सत्ता कायम राखली आहे. या समितीवर काँग्रेसनं भाजपचा धुव्वा उडवला आहे. पटोलेंच्या समर्पित पॅनलने 14 जागा जिंकल्या असून भाजपा राष्ट्रवादी युतीला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत. खरंतर याठिकाणी पटोलेंना चितपट करण्यासाठी भाजपानं थेट कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच युती केली होती. पण तरीही पटोले दणदणीत विजय मिळवत भाजप राष्ट्रवादी युतीला पराभवाचा धक्का दिला.

भंडाऱ्यापाठोपाठ गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न पाहण्यास मिळाला. भाजपने राष्ट्रवादीसोबत घरोबा करीत काँग्रेसलाच हात दाखविला. यावर नाना पटोले(Nana Patole) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. तसेच त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच खिंडीत गाठण्याचा डाव तर नाही ना याची जोरदार चर्चा विदर्भाच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. पण शनिवारी लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत यश मिळवलं आहे.

Nana Patole
Majalgaon APMC Result News : माजलगांव बाजार समितीत ११ जागा जिंकत राष्ट्रवादीची सत्ता...

काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या मतदारसंघातील महत्त्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसनं विजय खेचून आणला आहे. तर भाजपा (BJP ) राष्ट्रवादी युतीसाठी हा पराभव म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. सहकार क्षेत्रावर पकड मजबूत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

Nana Patole
Gopichand Padalkar slapped News : आमदार पडळकरांनी ग्रा. पं. सदस्याच्या कानाखाली वाजवली; केंद्राबाहेर तणावाची परिस्थिती !

काँग्रेस(Congress)ला दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद असो की भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायत प्रमाणे भाजपाने आपला शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करीत काँग्रेसला धक्का दिला. गोंदिया जिल्ह्यात 2 कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून निवडणुकीत अभद्र युती झाली. भाजपा, राष्ट्रवादी, शेतकरी पॅनल लढवत आहे. तर काँग्रेस ही स्वबळावर लढत आहे. नाना पटोले यांना मात देण्यासाठी अभद्र युती झाली असल्याचे पाहायला मिळतं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com