Nana Patole : नाना पटोलेंच्या घरी सराफा व्यावसायिकाचा गोंधळ, पीए डागेंवर केला आरोप!

Chhatrapti : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सराफा असोसिएशनने कार्यक्रम आयोजित केला होता.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Complaint of being cheated by Patole's personal assistant : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी आज सकाळी एका सराफा व्यावसायिकाने चांगलाच गोंधळ घातला. पटोलेंच्या स्वीय सहायकाने फसवले असल्याची तक्रार त्यांची होती. वेळ देऊनही कार्यक्रमाला नाना आले नाही, असा आरोप त्यांनी केला.

नितीन साळवे हे सराफा व्यावसायिक आहेत. नागपूर शहरातील सराफा बाजारात टांगा स्टॅंड परिसरात त्यांचे दुकान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सराफा असोसिएशनने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी नाना पटोले यांनी रीतसर निमंत्रण दिले होते. यासाठी त्यांनी पटोलेंचे पीए उमेश डांगे यांची आणि नाना पटोलेंचीही भेट घेतली होती. त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे कबूलही केले होते.

गेल्या १५ दिवसांपासून मी उमेश डांगे यांच्या संपर्कात होते. वेळोवेळी त्यांना अपडेट देत होतो. कार्यक्रमाची पत्रिका छापण्यापासून ते पोस्टर्स, बॅनर्स लावल्याचीही माहिती उमेश डांगें यांना दिली. नाना पटोले येतील, असेही डांगेंनी मला सांगितले होते. पण नंतर नंतर ते मला टाळू लागले. माझा कॉल घेत नव्हते, भेटत नव्हते. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पटोले कार्यक्रमाला येतील, असे समजून आम्ही पूर्ण तयारी केली. पण केवळ या उमेश डांगेंमुळे पटोले आले नाही, असे सराफा व्यावसायिक नितीन साळवे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी आम्ही गांधी चौकापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत पोस्टर्स, बॅनर्स, गेट आदी लावले होते. पुण्याचे (Pune) प्रफुल्ल माटेगावरकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सराफा बाजार मित्र परिवारातर्फे गेल्या ८ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. यासाठी आम्ही दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले. पण उमेश डांगे यांच्यामुळे आमचा असोसिएशनची बदनामी झाली. आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, असेही नितीन साळवे म्हणाले.

Nana Patole
Nana Patole News : नाना पटोलेंनी करुन दाखवलं; तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला

हा महाराजांचाही अपमान !

शब्द देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला न येणे हा केवळ आयोजकांचाच अपमान नाही, तर महाराजांचाही अपमान आहे. हे केवळ आणि केवळ पटोलेंचे पीए उमेश डांगे यांच्यामुळे झाले आहे. असा पीए ठेवला तर पटोलेंचे नुकसान होणार आहे. असा पीए कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून तोडण्यास कारणीभूत ठरणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांसोबत असे व्हायला नको. स्वतः नाना पटोलेंनी याची काळजी घ्यायला हवी, असेही नितीन साळवे म्हणाले. एकंदरीतच उमेश डांगेंवर त्यांचा तीव्र रोष होता.

उमेश डांगे यांच्या नावाने आगपाखड केल्यानंतर साळवे यांनी नाना पटोलेंची (Nana Patole) भेट घेतली. ‘निवडणूक असल्यामुळे मला ऐन वेळेवर मतदारसंघात जावे लागले. त्यामुळे मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.’, असे नाना पटोलेंनी सांगितल्याचे साळवे म्हणाले. पण पीए डांगेंवर त्यांचा रोष कायम होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com