Nana Patole : नानांच्या या तंबीनंतर, कॉंग्रेस नेत्यांनी केली ‘ही’ तक्रार; विषय चिघळणार ?

Congress : देवडिया भवनमध्ये न येणाऱ्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Congress leaders have asked the question to Nana : कॉंग्रेसमधील गटबाजी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. गुरुवारी (ता. ४ मे) नाना पटोले यांनी गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत कॉंग्रेसच्या अधिकृत देवडिया भवनमध्ये न येणाऱ्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, अशी तंबी दिली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी नानांचा प्रश्‍न विचारला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजीचा हा विषय ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा चिघळणार, असे चित्र आहे. (This issue will be heated again in the run-up to the election)

देवडिया काँग्रेस भवनात होणाऱ्या शहर काँग्रेसच्या बैठकांचे निमंत्रण विशिष्ट गटाच्या पदाधिकाऱ्यांनाच दिले जाते. काही पदाधिकारी येऊ नये, अशीच व्यवस्था येथे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांऐवजी जे बैठकांना बोलावत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

देवडिया भवन येथे गुरुवारी (ता. ४ मे) झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. बैठकांना दांड्या मारणाऱ्या आणि देवडिया भवनमध्ये जाणीवपूर्वक येण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले. याउपर जाऊन पटोले यांनी जे देवडियात येणार नाही त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असाही इशारा दिला.

नाना पटोलेंच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारच्या बैठकीला माजी मंत्री नितीन राऊत, (Nitin Raut) सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. काही नेत्यांनी सुमारे पाच वर्षांपासून देवडियाची पायरीसुद्धा चढलेली नाही. मुत्तेमवार-ठाकरे (Vikas Thakre) गटाच्या विरुद्ध राऊत-चतुर्वेदी असा आपसी संघर्ष अनेक वर्षांपासून शहरात सुरू आहे.

Nana Patole
Nana Patole On BJP: नाना ‘ऑन दी स्पॉट’; म्हणाले, भाजप म्हणजे पाकिटमार..!

या संदर्भात बैठकीला काही अनुपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता ते म्हणाले, बैठकांना बोलवल्या जात नसल्याच्या तक्रारी आम्हीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केल्या आहेत. त्यांच्यावर आधी कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही देवडियात येऊ नये, असे येथील काही लोकांना वाटते. त्यामुळे बैठकांचे निमंत्रण पाठवले जात नाही. याचे भांडवल करून आमच्याच विरोधात तक्रारी केल्या जातात, असे कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणाले.

Nana Patole
Nana Patole News: नाना पटोले म्हणाले, पुढचा आठवडा राज्यातील घडामोडींसाठी महत्वाचा; कारण...

पदाधिकाऱ्यांना बैठकांचे रीतसर निमंत्रण पाठवावे लागते. प्रदेश काँग्रेसची बैठक असल्यास मेल धाडला जातो. एवढेच नव्हे तर पत्रही पाठविले जाते. त्या बैठकांना सर्व पदाधिकारी उपस्थित असतात. मात्र मुद्दामच येऊ नये, म्हणून शहर काँग्रेसच्यावतीने काही लोकांना निमंत्रण दिले जात नाही, असाही या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

काँग्रेसच्या (Congress) बैठकांना व देवडियात जाण्यास कोणाचीच हरकत नाही. मात्र आम्हाला मुद्दामच निमंत्रण दिले जात नाही. आम्ही बैठकांना येऊ नये, असेच प्रयत्न केले जात आहेत. प्रदेशच्या बैठकांचे आम्हाला निमंत्रण दिले जाते. त्यात आम्ही सर्व उपस्थित असतो. आम्हीसुद्धा काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आमच्याही तक्रारीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लक्ष घालावे.

- तानाजी वनवे, महासचिव, प्रदेश काँग्रेस.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com