Nana Patekar : खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्या नाना पाटेकर येणार...

Nitin Gadkari : खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे उद्या सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
Nana Patekar and Nitin Gadkari.
Nana Patekar and Nitin Gadkari.Sarkarnama

MP Cultural Festival : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे उद्या सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांची प्रत्‍यक्ष तर ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद्गुरू जग्‍गी वासुदेव यांची आभासी उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) सांस्‍कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, (Sudhir Mungantiwar) भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचीदेखील उपस्‍थ‍िती राहणार आहे.

स्‍वातंत्र्यांच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षान‍िम‍ित्‍त स्‍थानिक कलाकारांच्‍या ‘वंदेमातरम्’ हा बहुरंगी कार्यक्रमाने महोत्‍सवाचे उद्घाटन होईल. यात स्‍थानिक १ हजार कलाकारांचा समावेश असून नृत्‍य, नाट्य, गायन, वादन आदींचा संगम असेल. हा कार्यक्रम २५ हजार चौरस फूट आकाराच्या ११ फूट उंचीचा ४ स्‍तरीय मंचावर सादर केला जाणार आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात २५ हजार रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था, जवळपास १ हजार लाइट्स, ३५० माईक्स, ३ हजार ५०० स्क्वेअर फुटांचे एल. इ. डी. स्क्रीनस्, ३ हजार कलाकार असे भव्‍य आयोजन यंदा राहणार आहे.

रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेदरम्‍यान गीता पठन महायज्ञ होणार असून याचे उद्घाटन श्रीनाथपीठ, श्री देवनाथ मठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जीच्‍या रेणुका मायबाई यांच्‍या हस्‍ते होईल. यावेळी राष्‍ट्रसेविका समितीच्‍या संचालिका शांताक्‍का यांची आभासी उपस्‍थ‍िती राहणार असून स्‍वागताध्‍यक्ष कांचन गडकरी आहेत. या महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्‍य बाळ कुळकर्णी आणि किशोर पाटील यांनी केले आहे.

Nana Patekar and Nitin Gadkari.
Video: महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका, विचार आत्मसात करा, नाना पाटेकर

मिस कॉल द्या पासेस मिळवा..

नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा म्हणून ऑनलाइन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरिता नागरिकांनी ९१५८८८०५२२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com