नाना.. आता तुम्ही शांत बसा, आम्ही देऊ ओबीसी आरक्षण !

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसींना आरक्षण मिळवून देतील. त्यामुळे नाना.. आता तुम्ही शांत बसा, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिला.
Chandrashekhar Bawankule and Nana Patole
Chandrashekhar Bawankule and Nana PatoleSarkarnama

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) ज्या निवडणूक जाहीर केल्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत पावसामुळे 80 टक्के मतदार मतदानाला जाऊ शकत नाही. ऐन पावसाळ्यात निवडणुका हा एककल्ली निर्णय आहे. राज्य सरकारशी चर्चा न करता राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, हा राज्याच्या हिताचा निर्णय नाही. सप्टेंबरपर्यंत निवडणूका घेऊ नये, त्यानंतर घ्याव्या. तोवर निवडणुका पुढे ढकलाव्या. सोमवारी दुपारी ३ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहो. सर्व पक्षीय लोक हे निवेदन देतील. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत ते म्हणाले, नाना पटोले खोटे (Nana Patole) बोलतात. जनतेची दिशाभूल करत आहेत. आता उलट्या बोंबा मारत आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यातील मंत्री मोर्चा काढत बसले. महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा खून केला असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या अडीच वर्षांत चार वेळा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, इम्पिरिकल डेटा तयार करा. ही जबाबदारी राज्य सरकारची होती, पण महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारकडे डेटाची मागणी करीत राहिले आणि निव्वळ टाइमपास केला. आता आमचे सरकार येऊन चारच दिवस झाले. त्यात नाना पटोले म्हणतात की, ओबीसी आरक्षण न मिळणे, ही देवेंद्र फडणवीस यांची चूक आहे. उलट नाना पटोलेंनीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ उडवला. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसींना आरक्षण मिळवून देतील. त्यामुळे नाना.. आता तुम्ही शांत बसा, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी दिला.

Chandrashekhar Bawankule and Nana Patole
बावनकुळे म्हणाले, महाविकासच्या काळातील प्रभाग रचना रद्द करा !

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ही वीज दरवाढ झाली आहे. मी मागेच सांगितले होते की, जानेवारी ते जून महिन्यापर्यंत कोळशाचे नियोजन करणे गरजेचे आहे. ते महाविकास आघाडी सरकारने केले नाही. हायड्रो प्रकल्पाचे नियोजन करणेही गरजेचे होते, तेसुद्धा केले नाही. उन्हाळ्यात सरकारला महागडी वीज खरेदी करावी लागली. ही त्यांच्या नियोजनशून्यतेमुळे. त्याचा भार आता जुलैपासून पुढचे चार ते पाच महिने जनतेला दरवाढ स्वरूपात भोगावे लागणार आहे, असेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com