नानाही म्हणाले, आडनाव गृहीत धरणे चुकीचे; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र...

इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. आडनाव गृहीत धरणे चुकीचे आहे.
नानाही म्हणाले, आडनाव गृहीत धरणे चुकीचे; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र...
Nana PatoleSarkarnama

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. पण केवळ आडनावांवरून हा डेटा गोळा केला जातोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर काल आक्षेप घेतला. त्यावर ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांचे म्हणणे योग्य आहे, असे म्हटले होतो. आता नाना पटोलेंनीही त्यांचीच री ओढली आहे.

इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. आडनाव गृहीत धरणे चुकीचे आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) पत्रही दिले आहे. ते म्हणाले, राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) (OBC) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डेटा (Imperical Data) गोळा करण्याचे काम सुरू आहे परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहीत धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी, यासाठी संबंधितांना सूचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डेटा गोळा करण्याचे कामही सुरू आहे. पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातींत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने डेटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे.

Nana Patole
काँग्रेसचा मोर्चा ईडीवर धडकला : पटोले म्हणाले, हुकुमशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देणार

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी (डेटा) जमा होईल यात लक्ष घालावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in