मेट्रोचे ‘हे’ दृष्य दाखवून नागपुरकरांना घाबरवण्यात आले, पण काळजीचे कारण नाही...

महामेट्रोच्या (Metro) पहिल्या टप्प्यातील मार्गीका दोनचे काम नागपूर-कामठी मार्गावर सुरू आहे. या दरम्यान इंदोरा चौकानजीक डबलडेकर पुलाच्या एका छिद्रामधून पाण्याच्या धारेसारखी माती पडत होती.
Metro Nagpur
Metro NagpurSarkarnama

नागपूर : आज सकाळी नागपूर-कामठी मार्गावरील महामेट्रोच्या निर्माणाधीन पुलावरील एका छिद्रातून माती पडत होती. त्याचा लहानसा ढिगाराही रस्त्याच्या मधोमध तयार झाला. दरम्यान कुणीतरी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर अपलोड केला. तेव्हापासून मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या चर्चांना पेव फुटले. या घटनेचा मागोवा घेतला असता वास्तव पुढे आले.

महामेट्रोच्या (Mahametro) पहिल्या टप्प्यातील मार्गीका दोनचे काम नागपूर-कामठी (Nagpur) मार्गावर सुरू आहे. या दरम्यान इंदोरा चौकानजीक डबलडेकर पुलाच्या एका छिद्रामधून पाण्याच्या धारेसारखी माती पडत होती. लगेच कुणातरी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले. काही अंशी भीतीचेही वातावरण तयार होऊ लागले. पण यामागचे वास्तव जाणून घेण्यासाठी मेट्रोच्या कार्पोरेट कम्युनिकेशनचे डीजीएम अखिलेश हळबे यांना विचारणा केली असता, त्यांनी यामागचे कारण सांगितले.

अखिलेश हळबे म्हणाले, मेट्रोच्या डबलडेकर पुलाचे काम निर्माणाधीन आहे. पुलावर तेवढ्या जागेवरचे काम झाले की, तेथील माती आणि सिमेंट साफ केले जाते आणि पुलावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी छिद्र केलेले आहेत. त्याला पाइप लावून ते पाणी डिव्हाईडरमध्ये लावलेल्या झाडांमध्ये सोडले जाते आणि हे काम निर्माणाधीन असल्यामुळे काही ठिकाणी ते पाईप अद्याप लावण्यात आलेले नाही. पण पावसाळ्यापूर्वी ते लावले जातील. आज सकाळी तेथील कामगाराने माती आणि सिमेंट साफ केले, पण तेथून उचलण्याचे तो विसरला आणि ते मग पाणी जाण्यासाठी असलेल्या छिद्रातून खाली पडले, येवढी साधी घटना आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही आणि घाबरण्यासारखे तर काहीच नाही.

Metro Nagpur
खासदार तुमानेंना नागपुरात हवी मेट्रो फेज-II, म्हणाले रामटेकचा विकास होणार...

मेट्रोच्या कामामध्ये कामठी रोड आणि वर्धा (Wardha) रोड, असे दोन ठिकाणी डबलडेकर पूल आहेत. कामठी रोडचा पूल साधारणतः ५.५ किलोमीटर, तर वर्धा रोडवरील पूल ३.५ किलोमीटर अंतराचा आहे. मूळ डीपीआरमध्ये या पुलाच्या कामाचा समावेश नव्हता. पण नंतर नॅशनल हायवे ॲथोरीटी ऑफ इंडियाकडून हे काम आम्हाला देण्यात आले आणि कामठी रोडला फोर लेन स्ट्रक्चर आहे. त्याच मार्गावर आजची घटना घडली. पण त्यामध्ये कुठलीही गंभीर बाब नाही, तर ही प्रक्रिया आहे. पण पुलाचे काम सुरू असताना पडणारी माती बघून आश्‍चर्य आणि भिती वाटणे स्वाभाविक आहे. या घटनेमुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही, असे अखिलेश हळबे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in