Nagpur Teachers Constituency Election : महाविकासकडून ‘हे’ असणार उमेदवार !

Mahavikas Aghadi : या विषयावर चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की या जागा आम्हाला मिळतील.
Shivsena
ShivsenaSarkarnama

Shivsena : शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nagpur Teachers Constituency Election) आम्ही नागपूर (Nagpur) आणि अमरावती (Amravati) या दोन्ही जागांवर आमचे उमेदवार उभे करण्याची मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की या जागा आम्हाला मिळतील. दोन्ही मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार सक्षम आहेत, असे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितले.

गेल्या ५ वर्षांपासून आमच्या उमेदवारांचे या क्षेत्रात मोठे काम आहे. गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी त्यांनी संपर्क केलेला आहे. शिक्षकांचे प्रश्‍न, मग ते राज्य पातळीवरचे असो किंवा जिल्हा पातळीवरचे, ते सोडवण्याचे काम आमच्या लोकांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिक्षक सेनेसोबत दोन्ही मतदारसंघातील शिक्षक शक्तीनिशी उभे राहतील. महाविकास आघाडी मिळूनच हे उमेदवार ठरलेले आहेत आणि आम्ही एकत्र मिळूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने नुकतेच एक नोटीफिकेशन काढले. त्यामध्ये विधानपरिषदेची नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित केली आहे. नागपूरची निवडणूक होऊ घातली आहे. शिक्षक सेनेचे उमेदवार म्हणून गंगाधरराव नाकाडे यांना उमेदवारी दिली आहे. वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भात नुकतीच चर्चा झाली, त्यांनीही या नावाला अनुकूलता दर्शविली आहे. शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आमच्या उमेदवारांना समर्थन मिळालेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हालाच यश मिळेल, याची खात्री अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

राज्यात ज्या पाच मतदारसंघात ही निवडणूक होत आहे, त्यांपैकी एक किंवा दोन मतदारसंघ शिवसेनेला मिळावे, याबाबत महाविकास आघाडीत यापूर्वीच चर्चा झालेली आहे. कोकण, नाशिक आणि मराठवाडा विभागाचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्याबाबतही ठरले आहे. कारण ते महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे उमेदवार आहे. त्यामुळे आम्हाला दोन जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही अभ्यंकर म्हणाले. नागपूर शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना शिक्षक परिषदेचा पाठिंबा आहे, पण शिक्षक परिषद ही भाजपची अधिकृत संघटना नाही.

Shivsena
Shiv Sena Bhavan: उद्धव ठाकरे लवकरच शिवसेना भवनाची चावी मुख्यमंत्र्यांना देणार ?

भाजपला पाठिंबा देणारी ती संघटना असेलही, पण अंगभूत घटक म्हणून जशी शिवसेनेची शिक्षक सेना आहे, तशी भाजपची ती संघटना नाही. भाजपने गाणार यांना पाठिंबा दिल्याचीही माहिती अद्याप नाही. भाजपचा त्यांच्याव्यतिरिक्त दुसरा उमेदवार आहे, अशी चर्चा सुरू आहे. पण आमचा एकच उमेदवार राहील आणि तोसुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि नागपूरसाठी गंगाधर नाकाडे हे आमचे अधिकृत उमेदवार असणार आहे. असे अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय अध्यक्ष गंगाधर नाकाडे, नागपूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर बावनकर, विजय बावनकर आदी पदाधिकारी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in