Nagpur News : नागपुरातही होऊ शकते पिंपरी-चिंचवडसारखी दुर्घटना, तीनशेच्या वर होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत !

Pimpri-Chinchwad : होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले.
Hording in Nagpur
Hording in NagpurSarkarnama

Dangerous hoardings News : वादळी पावसाने काल परवा सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये एक अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले. नागपुरातही असे धोकादायक होर्डिंग्ज असून नागरिकांच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. जोरदार वादळात होर्डिंग कोसळल्यास पिंपरी-चिंचवडप्रमाणे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (The possibility of a major accident cannot be ruled out)

नागपूर शहरात अकराशे होर्डिंग्स असून त्यातील तीनशे होर्डिंग्स नागरिकांच्या जिवाला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. दर तीन वर्षांनी होर्डिंग्सच्या सुस्थितीबाबत महापालिकेकडे एजन्सीधारकांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने होर्डिंग्सच्या सुस्थितीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवड येथे होर्डिंग्स कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अशा घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने दर तीन वर्षांनी अधिकृत स्‍ट्रक्चरल ऑडिटरकडून होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नियम जाहीर केले आहे. अर्थात दर तीन वर्षांनी होर्डिंग्सची क्षमता तपासणी करणे आवश्यक असून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे देऊन परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.

महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील होर्डिंग्सबाबत सर्वेक्षण केले. शहरात अकराशे होर्डिंग्स आढळले. यातील तीनशे होर्डिंग्सच्या एजन्सीने तीन वर्षांचा काळ लोटूनही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे महापालिकेने या तीनशे होर्डिंग्सच्या एजन्सीला नोटीस बजावली आहे. एखादवेळी होर्डिंग्समुळे जीवित हानी झाल्यास सर्वस्वी एजन्सी जबाबदार राहील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Hording in Nagpur
Nagpur Assembly Constituency News: नागपूर पूर्वमध्ये भाजपला पराभूत करणे आघाडीसाठी अवघड नाही, पण...

अद्यापही या तीनशे होर्डिंग्सच्या एजन्सीधारकांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर केले नाही. या प्रकरणात संबंधित एजन्सीचा होर्डिंग्सचा परवाना रद्द करण्याची तसेच परवाना रद्द केल्यानंतर तीनशे होर्डिंग्स काढण्यासाठीही पावले उचलण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. या तीनशे होर्डिंग्सची स्थिती वाईट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एखाद्या वादळात यांपैकी काही होर्डिंग्स कोसळल्यास पिंपरी-चिंचवडसारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे शहरात काही इमारतींवरही होर्डिंग्स आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करण्याकडेही अनेक एजन्सीने दुर्लक्ष करीत असल्याने इमारतीतील कुटुंबीयांवर संकट येण्याची शक्यता बळावली आहे.

Hording in Nagpur
BRS Meeting at Nagpur: बीआरएसचे पूर्व विदर्भात दमदार पाऊल, नागपुरातील बैठकीत ठरली रणनीती !

रेल्वे प्रशासनाकडून महापालिका बेदखल..

रेल्वे (Railway) स्टेशन किंवा रेल्वेच्या इतर जागांवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहे. या होर्डिंग्सधारकांकडून रेल्वे मोठा महसूल वसूल करते. यांपैकी बरेच होर्डिंग्स जिर्णावस्थेत आहेत. यातील अनेक होर्डिंग्स आकाराने मोठे असल्याने महापालिकेने तयार केलेल्या फुटपाथवर उभे आहेत. महापालिकेने अनेकदा पत्रव्यवहार केला. फेब्रुवारीत आयुक्तांनी (Commissioner) विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवले. परंतु रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनसारख्या परिसरात होर्डिंग्स कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने (Municipal Corporation) शहरातील (Nagpur) होर्डिंग्सचे सर्वेक्षण केले. यात तीनशे जणांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले नसल्याचे उघडकीस आले. या सर्वांना महापालिकेने नोटीस बजावली. होर्डिंग्स कोसळल्याने जीवित हानी झाल्यास सर्वस्वी या एजन्सी जबाबदार राहतील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. एजन्सीने अधिकृत स्‍ट्रक्चरल ऑडिटरकडून प्रमाणपत्र घेऊन महापालिकेकडे सादर करणे आवश्यक आहे.

- मिलिंद मेश्राम, उपायुक्त, महापालिका

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com