Devendr a Fadanvis
Devendr a FadanvisSarkarnama

Nagpur News : नागपूरला मिळाले नऊ कोटी, फडणवीसांचा जिल्हा वगळल्याने कॉंग्रेसने केले होते आंदोलन !

Devendra Fadanvis : फडणवीस यांच्या नागपूरलाच वगळल्याने हा मुद्दा तेव्हा चांगलाच तापला होता.

Nagpur got nine crores : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भासह नागपूर जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण नुकसान भरपाई देताना शासनाने नागपूर जिल्ह्याला वगळले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरलाच वगळल्याने हा मुद्दा तेव्हा चांगलाच तापला होता. कॉंग्रेसने या विरोधात आंदोलनही केले होते. (Congress had also protested against this)

त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या यादीत शासनाने नागपूर जिल्ह्याचा समावेश केला आणि जिल्ह्याला नऊ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, चणा, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. संप काळातही महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. प्राथमिक सर्वेक्षणात सात हजारांवर पिकांचे नुकसान झाल्याचा समोर आले. अंतिम अहवालात हा आकडा ४४४१ हेक्टर होता.

दरम्यानच्या काळात शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली. खरीप हंगामात अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला. काहीसे पीक हातात आले. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. रब्बीत चांगले पीक होण्याची अपेक्षा होती. परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीने त्यावर पाणी फिरले. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. मार्च महिन्यात चार हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Devendr a Fadanvis
Sharad Pawar Retirement : Devendra Fadanvis म्हणतात आपण वाट पाहिली पाहिजे | NCP | BJP | Sarkarnama

मार्च महिन्यात झालेल्या नुकसानासाठी मदत देण्यासाठी १० एप्रिलला शासनाने आदेश काढला. परंतु यात नागपूर (Nagpur) जिल्ह्याचा समावेश नव्हता. उपमुख्यमंत्र्यांचा (Devendra Fadanvis) जिल्हा मदतीतून वगळल्याचे वृत्त ‘सरकारनामा’ने प्रकाशित केले होते. नागपूर जिल्ह्याला वगळल्याच्या विरोधात कॉंग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. आता शासनाने (State Government) नुकसानापोटी नऊ कोटी सात लाख ४५ हजार ७०० रुपयांचा निधी मंजूर केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in