Nagpur : नागपुरातील माझा विजय म्हणजे सरकारच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोश !

Sudhakar Adbale : रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा देत राहू
Chandrapur
ChandrapurSarkarnama

MLC Sudhakar Adbale News : शाळा आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकारने केलेले आहे. आजमितीस शिक्षकांच्या राज्यात ५७ हजार जागा रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा देत राहू, असे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले म्हणाले.

मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. जुन्या पेंशनसाठी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढा देवू. तब्बल ७५ वर्षांनी चंद्रपूरला हा सन्मान मिळाला आहे. हा विजय धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आहे, असेही आमदार अडबाले म्हणाले. ते चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) होते. प्रमुख अतिथी सीमा अडबाले, आमदार प्रतिभा धानोरकर, (Pratibha Dhanorkar) माजी आमदार व्हि.यू. डायगव्हाणे, डॉ. बबनराव तायवाडे, (Babanrao Taywade) जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष, वितेश खांडेकर, राजेंद्र वैद्य, संदिप गिर्हे, रामू तिवारी, अरुण धोटे, परशुराम धोटे, प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य शाम धोपटे, राजेंद्र खाडे, राजेश नायडू, दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे आदी उपस्थित होते.

Chandrapur
Nagpur Teacher Election : भाजपच्या नागपुरात 'मविआ'चा झेंडा ; या 'चार' कारणांमुळे सुधाकर अडबाले यांचा विजय...

भाजपचा गड असलेल्या नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदार संघात झालेला माझा विजय हा सरकारच्या विरोधात असलेला प्रत्येकाच्या मनातील आक्रोश आहे, असेही आमदार अडबाले म्हणाले. यावेळी जुन्या पेन्शन हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. संचालन सतीश मेश्राम यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष विपीन धाबेकर यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com