Winter Session 2022 : भष्ट्राचाराचा आरोप असलेले अब्दुल सत्तार आज उत्तर देणार का ?

Maharashtra Assembly Winter Session 2022 : एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला सरकारी विमाने रवाना झाले आहेत.
Minister Abdul Sattar News,
Minister Abdul Sattar News, Sarkarnama

Maharashtra Assembly Winter Session: नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक मुद्यांवरुन सत्ताधारी-विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगत आहे. विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला सरकारी विमाने रवाना झाले आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरेंनी हे आरोप फेटाळले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आदित्य ठाकरे यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Minister Abdul Sattar News,
OBC Reservation : मोठी बातमी ; ओबीसी आरक्षणशिवाय नगरपालिका निवडणुका ; न्यायालयानं सांगितलं,..

शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील काही मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी आज यावर शंका व्यक्त करत शिंदे गटातील मंत्र्यांचे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपचाच तर हात नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

भष्ट्रमंत्र्यांची हकालपट्टी करणार का ?

"शिंदे-फडणवीस सरकार हे गद्दार सरकार आहे. हे सरकार अनैतिक, घटनाबाह्य सरकार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भष्ट्रमंत्र्यांची हकालपट्टी करणार का ?,"असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात बेकायदा सरकार आहे. त्यामुळेच सीमावादावर सरकारकडून कर्नाटकविरोधात ठाम व आक्रमक भूमिका घेतली जात नाही. आम्ही कर्नाटकची नव्हे तर महाराष्ट्राचीच भूमिका मागत आहोत, असे प्रत्युत्तरही आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.

गायरान जमीन घोटाळा प्रकरणात काल (मंगळवारी) कृषिमंत्री अब्दुल सत्तार विधानसभेत आपली बाजू मांडणार होते. मात्र, काल अब्दुल सत्तार विधानसभेत काहीच बोलले नाहीत. विरोधकांनीही तशी मागणी न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे आज (बुधवारी) तरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज तरी विधानसभेत आपल्यावर झालेल्या आरोपांविरोधात विधानसभेत बोलणार का? हे आज समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com