Nagpur : ‘गरुडा’ने परवा मागितले होते पुरावे, किशोर गजभियेंनी आज पत्रकारांसमोर सादर केले !

Dr. Ambedkar : सिमेंट, कॉंक्रीटच्या ढिगाऱ्यांमध्ये लोखंडाच्या सळाखीसुद्धा पाहिजे होत्या. पण...
Kishor Gajbhiye with others.
Kishor Gajbhiye with others.Sarkarnama

Nagpur City News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक परिसर बचाव कृती समितीने बाबासाहेबांचे स्मारक गरुडा कंपनीने पाडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ती जमीन स्मारकाची होती, याचे पुरावे काय, असा सवाल गरुडा कंपनीतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर आज समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले.

स्मारक वादळवाऱ्याने पडले नाही तर पाडण्यात आले, याचा पुरावा देताना गजभिये म्हणाले, स्मारक ८ जूनच्या पूर्वी पडले. त्यानंतर १६ जून २०२१ रोजी आम्ही पोलिसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. पुरावे म्हणून तेव्हाचे फोटो, व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आम्ही गेलो त्यापूर्वीच स्मारक उद्ध्वस्त केले होते. तो इमला जर नैसर्गिक आपत्तीमध्ये पडला, तर सिमेंट, कॉंक्रीटच्या ढिगाऱ्यांमध्ये लोखंडाच्या सळाखीसुद्धा पाहिजे होत्या. पण त्या दिसल्या नाहीत.

ते बांधकाम यंत्रांच्या साहाय्याने पाडण्यात आले आणि त्यातील लोखंड तेथून उचलण्यात आले, असल्याचा आरोप गजभियेंनी केला. दुसरा पुरावा म्हणजे राज्य नगररचना विभागाचा (Town Planning Department) आहे. त्यामध्ये ती जमीन स्मारकाची (Dr. Babasaheb Ambedkar) होती, हे दिसते. पण आता त्यावरून स्मारकाचा उल्लेख काढून त्याजागी नझूलचा उल्लेख करण्यात आला आहे. तिसरा पुरावा म्हणजे नागपूर (Nagpur) महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) नगर विकास विभागाचा नकाशा आहे. हा आम्ही माहितीच्या अधिकारात (RTI) मागितला.

महानगरपालिकेच्या नकाशामध्येही तसा उल्लेख बघायला मिळतो. पण यामध्ये जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खातेफोड करून मखलाशी केलेली आहे. हे त्यांनी स्वतः केलेले नाही, तर कुणाच्या ती सांगण्यावरून केलेले आहे. यामागे कुणीतरी खासगी व्यक्ती आहे. कारण हा फेरफार सन २०२१चा आहे आणि हा सर्व कारभार गरुडा कंपनीनेच केल्या असल्याचा स्पष्ट आरोप किशोर गजभिये यांनी केला.

Kishor Gajbhiye with others.
Nagpur : महानगरपालिका हातून गेली, तर भाजपला लोकसभा जिंकणे अवघड; म्हणून...

स्मारकाचे बांधकाम पाडण्याची परवानगी मागणारे पत्र गरुडा कंपनीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केली होती. त्यांनीच हे स्मारक बुलडोझर लावून पाडले आहे. ही पक्की इमारत वादळवाऱ्याने पडली, असे म्हणे म्हणजे समस्त नागपूरकरांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. त्यांची ही वक्तव्ये निराधार व गैरसमज पसरविणारी आहेत. त्याचा कृती समितीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे किशोर गजभिये यांनी आज सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in