Shiv Sena : आदित्य ठाकरेंसाठी वीज चोरी ; चौकशी सुरु, व्हिडीओ व्हायरल

Shiv Sena : शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Shiv Sena
Shiv Sena sarkarnama

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मानगाव राखेच्या बंधाऱ्याने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना (shiv sena) नेते आदित्य ठाकरे काल (शनिवारी) आले होते. आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना ते उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमाला वीज चोरी झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. (Shiv Sena news update)

या वीज चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shiv Sena
Pune Ganeshotsav : पुण्यातील 'ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष' पोलिसांनी रोखला..सांगितलं हे कारण..

विजेच्या दोन खांबांमधून तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. ही वीज चोरी आयोजकांनी केली की मंडप सेवा पुरवणाऱ्या पुरवठादाराने केली याबाबत चौकशी केली जात आहे.

नागपूरच्या नवीन सुभेदार लेआऊट परिसरात काल पोळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमासाठी व्यासपीठामागील विजेच्या खांबावरून वीज चोरी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Shiv Sena
Shiv Sena : अरविंद सावंत, भास्कर जाधवांना बढती, शिवसेनेच्या सचिवपदी पराग डाके

काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे गजानन परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची सभा झाली होती. या सभेसाठीही जवळच्या खांबावरून वीज चोरी झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे याप्रकरणी महावितरणने आयोजकांवर दंड ठोठावला होता.असाच दंड आता या आयोजकांना होणार का, असा प्रश्न जनता विचारत आहे.

ऊर्जा प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी होते आहे. पण त्यासाठी कुणीच कसं काही करत नाही, हे बघून मलाच आता लाच वाटायला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऊर्जामंत्रीसुद्धा आहेत. आता ही राखेची समस्या त्यांना मी सांगणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in