Nagpur : डॉ. परिणय फुके म्हणाले; कॉंग्रेस तुम्हाला आमदार करणार नाही, केदार म्हणाले आम्हीच करू !

Dr. Parinay Fuke : योग्य वेळ येऊ द्या. काँग्रेस सोडून जाण्याची काहीच गरज नाही, असे सुनील केदार म्हणाले.
Parinay Fuke, Sunil Kedar, Babanrao Taywade and Others.
Parinay Fuke, Sunil Kedar, Babanrao Taywade and Others.Sarkarnama

Nagpur Politics News : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. बबनराव तायवाडे यांना माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी आमदार व्हायचे असेल तर काँग्रेस सोडण्याचा सल्ला दिला, माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी आम्हीच तुम्हाला लोकप्रतिनिधी करू, असे सांगून काँग्रेस सोडू नका, असे बजावले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तुमचे ‘गुडविलच' तुम्हाला विधिमंडळाच्या सभागृहात पाठवेल, अशी आशा व्यक्त केली.

बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी श्री सच्चिदानंद शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात हा राजकीय कलगीतुरा रंगला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव घारड, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री परिणय फुके, नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार दीनानाथ पडोळे, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, माजी मंत्री रमेश बंग, डॉ. अक्षयकुमार काळे आदी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बहुजनांचे आधारवड गौरव ग्रंथ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना तायवाडे यांनी अभिजित वंजारी आणि सुधाकर अडबाले निवडून आल्याने आमच्या विचारांचा विजय झाल्याचे सांगितले. आता वयाच्या सत्तरीकडे वाटचाल सुरू आहे. वयाचा विचार करता आमदार होण्यापेक्षा ‘किंगमेकर'च्या भूमिकेत राहणे आता जास्त आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

ओबीसी महासंघाची चळवळ फोफावली, ३० शासनादेश केंद्र व राज्य सरकारकडून काढून घेण्यात यश आले. असे सांगताना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेकांना केलेली मदत व जोडलेली लोक बघता सर्व काही मिळाले असल्याची भावनाही याप्रसंगी डॉ. तायवाडे यांनी व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयात तायवाडे सरांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.

Parinay Fuke, Sunil Kedar, Babanrao Taywade and Others.
Fitness Funda : रोज पाच किलोमीटर चालणे, योग-प्राणायाम करून परिणय फुके राहतात फिट..

अभिजित वंजारी यांनी तायवाडे यांच्या सल्ल्यामुळेच आपण आमदार होऊ शकलो, असे सांगून त्यांचा उल्लेख राजकारणातील भीष्म पितामह असा केला. ओबीसी महासंघाच्या कार्यातून बबनराव तायवाडे यांनी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली. अभिजित वंजारी आणि सुधाकर अडबाले यांच्या विजयामुळे विदर्भात काँग्रेसची पाळेमुळे आजही जिवंत आहेत याची साक्ष मिळते. फक्त पक्ष व उमेदवाराला थोडी ताकद देण्याची गरज आहे. इतक्या वर्षांत आपल्या कार्यातून तुम्ही गुडविल तयार केले आहे. सर्व जुळून आले आणि सर्वांनी साथ दिली तर विधिमंडळाच्या सभागृहात जाणे अवघड नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Parinay Fuke, Sunil Kedar, Babanrao Taywade and Others.
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांचा विषय राजकारणातून संपला : सुनील केदार

काँग्रेसमध्ये राहून तुम्ही कधीच आमदार होऊ शकणार नाही. सर्वात आधी काँग्रेस पक्ष सोडा. पण भाजपात या, असे मी म्हणणार नाही. कारण तुमचे कार्य फार मोठे आहे. उद्या मुख्यमंत्रीसुद्धा तुमचे आशीर्वाद घ्यायला येतील, असे माजी राज्यमंत्री परिणय फुके म्हणाले.

डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांचा सल्ला बिलकूल ऐकू नका. त्यांनाही आम्ही काँग्रेस सोडण्यास सांगितले नव्हते. वंजारी आणि अडबाले यांच्याप्रमाणे सर्व काही जुळून येईल, तेव्हा आम्हीच तुम्हाला आमदार करू, हा माझा शब्द आहे. योग्य वेळ येऊ द्या. काँग्रेस (Congress) सोडून जाण्याची काहीच गरज नाही, असे उत्तर माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी डॉ. परिणय फुके यांच्या वक्तव्यावर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com