Nagpur APMC Election : युती-आघाडीने बिघडविले प्रस्थापितांचे गणित, रामटेक, कुही, पारशिवनीत मतदान सुरू !

Nagpur Bazar Samiti Election: मौदा बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार आहे.
APMC Election in Nagpur District
APMC Election in Nagpur DistrictSarkarnama

APMC Election voting start in Nagpur District : नागपूर जिल्ह्यातील सात बाजार समित्‍यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील तीन बाजार समितीसाठी आज (ता.२८) मतदान होत आहे. मौदा बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार आहे. सावनेरमध्ये सर्व उमेदवार बिनविरोध आल्याने तिथे मतदान होणार नाही. मात्र, युती-आघाडीने प्रस्थापितांचे गणित बिघडल्याचे दिसून येते. (The Kedar group has also won a total of 18 seats)

सावनेर बाजार समितीमध्ये आमदार सुनील केदार गटाने विरोधकांना धूळ चारीत संपूर्ण १८ जागाही जिंकल्या आहेत. विरोधकांनी केदार गटाच्या विरोधात उमेदवारी अर्जच न भरल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर रामटेक, कुही-मांढळ आणि पारशिवनी बाजार समितीसाठी आज (ता.२८) मतदान होत आहे.

रामटेक बाजार समितीमध्ये केदार गटाविरोधात चार पक्षांनी मोट बांधल्यामुळे शेवटी आमदार सुनील केदार यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्यासोबत युती करून विरोधकांविरोधात दंड थोपटले आहेत. तर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, कॉग्रेसचे गज्जू यादव यांच्यासह इतर दोन पक्षांनी मोट बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार केदार यांचे वर्चस्व राहिले आहे.

यावेळी मात्र, त्यांचे खंदे समर्थक विरोधात गेल्याने शेवटी आशिष जयस्वाल यांच्या गटासोबत युती करावी लागली. पारशिवनी येथे केदार गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. येथेही कॉंग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी अशीच रंगत राहणार आहे. कुही बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार राजेंद्र मुळक यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र, राष्ट्रवादीसोबत आघाडीची शक्यता असताना राजेंद्र मुळक गटाने कुरघोडी करीत आपले १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.

APMC Election in Nagpur District
Tiosa APMC : ...म्हणून यशोमती ठाकूर यांचे राष्ट्रवादीसोबत फिसकटले !

संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने जीवनलाल डोंगरे यांच्या नेतृत्वात दोन उमेदवार दिले असून सोबत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) घेतले आहे. त्यामुळे येथे (NCP) राष्ट्रवादी, भाजप आणि कॉंग्रेस (Congress) असा सामना रंगणार आहे. यात कॉंग्रेसचे किती उमेदवार निवडून येतात, याकडे लक्ष लागले आहे. माजी आमदार राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे याकडे लक्ष ठेऊन आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि रमेश बंग हेसुद्धा बाजार समितीत प्रवेशासाठी उत्सुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत.

APMC Election in Nagpur District
Barshitakali APMC News: महाविकास असूनही सहकारमध्ये सोयीचा ‘असहकार’, 'फिल्डिंग' अखेरच्या टप्प्यात !

उमरेड, भिवापूरसाठी ६ मे रोजी मतदान..

उमरेड, भिवापूर बाजार समितीचा (APMC Election) बिगूल वाजला असून उमेदवारांनी अर्ज भरले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. ६ मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही बाजार समितीवर भाजपचे (BJP) वर्चस्व गेल्या काही वर्षांपासून आहे. माजी आमदार राजेंद्र मुळक यांचा गड असलेल्या दोन्ही बाजार समित्या भाजपने काही वर्षांपूर्वी हिसकावून घेतल्या होत्या.

या निवडणुकीत राजेंद्र मुळक सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. माजी आमदार सुधीर पारवे आणि जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये तळ ठोकून आहेत. तर राजेंद्र मुळक यांच्या सोबतीला आमदार राजू पारवे असून वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com