
हिंगोली - हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात गेल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हाकालपट्टी केली होती. त्यामुळे बांगर यांच्यावर शिवसैनिक व विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकेला त्यांनी आक्रमकपणे उत्तर दिले. हे उत्तरच आज राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. (Shivsena | Santosh Bangar News Update)
संतोष बांगर यांनी हिंगोलीमधील एका कार्यक्रमात हे आक्रमक भाषण केले. आमदार बांगर म्हणाले की, मला आपल्या शिवसैनिकांना एकच सांगायचे आहे की, आपण शिवसैनिक आहोत. जो कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल त्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचे काम माझ्या शिवसैनिकाने करावं, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही घाबणारे शिवसैनिक नाही. आमच्या हातात बांगड्या नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी आरे म्हंटले तर त्याला कारे नाही तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाहीत. असे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत.
संतोष बांगर यांना शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चार दिवसांपूर्वीच हिंगोली ते मुंबई अशी रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. यात संतोष बांगर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची मते वळविण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.