Congress नेत्यांची मुंबईत बैठक झाली, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून उद्या घोषणा करणार...

Nagpur : नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

Maharashtra Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्या वेळापूर्वी मुंबईत बैठक झाली. आज ते नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवाराला समर्थन जाहीर करणार होते. मात्र आता उद्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांशी बोलून निर्णय जाहिर करणार असल्याची माहिती आहे.

नागपूरची (Nagpur) जागा शिवसेनेसाठी सोडल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर दबाव टाकून शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यायला लावली. काँग्रेसने नाशिकची (Nasik) जागा शिवसेनेसाठी सोडली. त्या बदल्यात नागपूरची जागा मागून घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अडबाले यांना समर्थन जाहीर करावे, यासाठी आग्रह धरला आहे.

काल माजी मंत्री आमदार सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बैठक घेऊन परस्पर अडबाले यांना काँग्रेसचे समर्थन असल्याचे जाहीर करून टाकले. त्यावर माजी आमदार आशिष देशमुख यांनी आपेक्ष घेतला आहे. केदार आणि वडेट्टीवार यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे सांगून त्यांनी आपला पाठिंबा शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना जाहीर केला आहे.

दरम्यान, शिक्षक भारतीचे नेते आमदार कपील पाटील दोन दिवस विदर्भात तळ ठोकून होते. झाडे यांना समर्थन जाहीर करावे, यासाठी अनेक नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पदवीधर निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्याला कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे केदार व वडेट्टीवार यांनी परस्पर समर्थन जाहीर केल्याने कपील पाटील नाराज होऊन निघून गेले. त्यांनी नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांना समर्थन जाहीर केल्याचे समजते.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aaghadi: राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार? राष्ट्रवादीच्या आमदाराने दिले मोठे संकेत

रात्री आठ वाजता महाविकास आघाडीची मुंबईत बैठक सुरू असल्याचे सांगून अडबाले यांनाच आघाडी समर्थन देणार असल्याचा दावा विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी अडबाले यांच्या जाहीर सभेची तयारीसुद्धा सुरू केली असल्याची माहिती आहे. चंद्रपूर येथे सभा घेऊन काँग्रेस अडबाले यांच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याचेही सांगण्यात येते. मात्र हे उद्या अधिकृत घोषणा झाल्यावरच कळणार आहे.

नागपूरमध्ये एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नागोराव गाणार यांना समर्थन जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संदीप इटकेलवार यांनी आधीच माघार घेण्यास नकार दिला असून बसपाच्या रिमा रंगारी आणि वंचित बहुजन आघाडीने पक्षातर्फे दीपककुमार खोब्रागडे लढतीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com