महापालिका निवडणूक : कॉग्रेस लागली उमेदवार शोधण्याच्या कामाला...

महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेतली.
Congress Meeting in Mumbai

Congress Meeting in Mumbai

Sarkarnama

नागपूर : महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर कॉंग्रेस (Congress) यावेळी सतर्क झाली आहे. कधी नव्हे ते पूर्वतयारीसाठी नेते कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नागपूर महानगरपालिका निवडणूक सिरिअसली घेतली आहे. त्यासाठी त्यांनी काल मुंबईत शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही निवडणूक स्वबळावर लढण्यासोबतच इतरही निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

वेळेवर शोधाशोध आणि कापाकापी करण्यापेक्षा काँग्रेसने आत्तापासून महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीसाठी उमेदवार शोधून ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय समीकरणे बघून उमेदवारी जाहीर करण्यात येईल. महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेतली. बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश महासचिव आमदार अभिजित वंजारी, उत्तर भारतीय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, व्यापारी व उद्योग सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रदेश सचिव संजय महाकाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. दीडशेंपैकी फक्त २९ उमेदवार निवडून आले होते. नेत्यांमधील अंतर्गत भांडणे, उमेदवारी वेळेवर जाहीर केल्याने उडालेला गोंधळ व त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवर झालेली शाईफेक याचा मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील वर्चस्व काँग्रेसने मोडून काढले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपविरोधात सर्वत्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.

<div class="paragraphs"><p>Congress Meeting in Mumbai</p></div>
भाजपा नेते दिवसा स्वप्न पाहतायत- नाना पटोले;पाहा व्हिडिओ

आपसातील भांडणांमुळे नुकसान होऊ नये याची दक्षता यावेळी घेण्यात येणार आहे. बैठकीत निवडणूक कशी लढायची, जातीय व राजकीय समीकरण कसे ठरवायचे, सर्व नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देऊन समतोल कसा साधायचा, यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी प्रभाग रचना, बूथ रचना, उमेदवारांची निवड यावरही चर्चा झाली. शहराचा प्रभागाचा आराखडा अद्याप जाहीर व्हायचा आहे. असे असले तरी आत्तापासून संघटनात्मक बांधणी आणि बूथ कमिट्‍या स्थापन करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लावावे, असेही काल मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com